PM Modi's Swearing-In Ceremony sakal
देश

PM Modi's Swearing-In Ceremony : गडकरी, गोयल, जाधव, भुमरे, पटेल यांना संधी?

सकाळ वृत्तसेवा

नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्रातून कुणाला संधी मिळणार, याबद्दल तर्क लावण्यात येत आहेत. काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका असल्याने प्रादेशिक समतोल व जातीय समीकरण जुळविले जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला व प्रामुख्याने भाजपला धक्का बसल्याने भाजपला यापुढे विचारपूर्वक पावले टाकावी लागणार आहेत. भाजपमधून नितीन गडकरी, पीयूष गोयल हे दोन कॅबिनेट मंत्री निश्चित मानले जात आहेत. राज्यमंत्र्यांत रक्षा खडसे, उदयनराजे भोसले यांचे नाव घेतले जात आहे. या वेळी ‘एनडीए’च्या सदस्यांना अधिक संधी लागत आहे. यामुळे रामदास आठवले यांना पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता नाही.

शिवसेनेला एक कॅबिनेट

शिवसेना गटाचे सात खासदार निवडून आले. या पक्षाला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यात प्रतापराव जाधव (बुलडाणा) यांना कॅबिनेट मंत्रिपद आणि मराठवाड्यातील संदीपान भुमरे किंवा धैर्यशील माने यांना राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकच खासदार सुनील तटकरे निवडून आले आहेत. या पक्षाकडून राज्यसभेतील खासदार प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's T20 World Cup: टीम इंडियाचा पहिल्याच सामन्यात पराभव; न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती

Rahul Gandhi यांच्या अडचणी वाढणार? पुणे विशेष न्यायालयाने समन्स बजावले, २३ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय?

Raj Thackeray On Zirwal : 'तुम्ही सत्ताधारी, संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय?'; झिरवाळांच्या आंदोलनावर राज ठाकरे संतापले

Women's T20 WC: भारत-न्यूझीलंड सामन्यात ड्रामा! रनआऊटनंतरही केरला अंपायरने दिलं नॉटआऊट, हरमनप्रीतही वैतागती; नक्की काय झालं?

Western Railway वर 5 आणि 6 ऑक्टोबरला तब्बल 10 तासांचा Block, काही गाड्या रद्द, अनेक ट्रेन विलंबाने धावणार, पाहा संपूर्ण तपशील

SCROLL FOR NEXT