PM Modi sakal
देश

Loksabha Election 2024: राम मंदिर, कलम 370, लाभार्थी, मोदींची गॅरंटी ... ही भाजपची २०२४ जिंकण्याची स्कीम

पाच राज्यांतील निवडणुकांनंतर आता लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडी आणि राज्य निवडणूक निकालानंतर चर्चा सुरू झाली आहे की, २०२४ च्या निवडणुकीचा अजेंडा भाजपसाठी निश्चित करण्यात आला आहे का?

अंकिता खाणे (Ankita Khane)

नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर सरकार स्थापनेची कसरत सुरू आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठा विजय मिळवला होता. या तीनपैकी दोन राज्यांमध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने नव्या चेहऱ्यांकडे सरकारची धुरा सोपवली आहे. पक्षाने छत्तीसगडमध्ये आदिवासी कार्ड आणि मध्य प्रदेशात ओबीसी कार्ड खेळले आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतही काही तासांतच चित्र स्पष्ट होईल. राज्य सरकारांसोबतच लोकसभा निवडणुकीचीही चर्चा होत आहे. राम मंदिर, कलम 370 या गोष्टी निवडणुकीसाठी अजेंडा असतील अशा चर्चा सुरू आहेत.  (Marathi Tajya Batmya)

याचं कारण म्हणजे मोदींची गॅरंटी हिंदी पट्ट्यातील तिन्ही राज्यांमध्ये बऱ्यापैकी यशस्वी ठरल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय समोर आला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिली आहे. संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने जम्मू-काश्मीर चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि ताज्या राजकीय घडामोडींमुळे भाजपचा 2024 चा अजेंडा निश्चित झाला आहे की काय अशीही चर्चा सुरू झाली आहे. (Marathi Tajya Batmya)

२०२४ मध्ये भाजपचा अजेंडा काय असेल?

१) राम मंदिर- राम मंदिर हा पहिल्यापासूनच भाजपच्या राजकारणाचा आधार राहिला आहे. भाजपने स्थापनेपासूनच जवळपास प्रत्येक निवडणुकीत राम मंदिराच्या उभारणीचा आपल्या जाहीरनाम्यात समावेश केला आहे. भाजपचा एक नाराही प्रत्येक निवडणुकीत चर्चेत येतो. 'रामलला हम आएंगे, मंदिर वहीं बनाएंगे'. या घोषणेचा आधार घेत विरोधी पक्षांनी 'मंदिर वहीं बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे' अशा घोषणा देत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

त्यानंतर आता रामाची मंदिरात स्थापना करण्याची तारीखही आली आहे. 22 जानेवारीला राम मंदिरात रामललाचा अभिषेक होणार आहे. तोपर्यंत लोकसभा निवडणुका जवळ आल्या असतील. राज्याच्या निवडणुकीत भाजपने ज्या प्रकारे राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे, या मुद्द्यावरून संपूर्ण देशात वातावरण निर्माण करण्याच्या रणनीतीवर पक्ष काम करणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत.(Latest Marathi News)

२) अनुच्छेद 370- केंद्रातील मोदी सरकारने कलम ३७० आणि ३५A हटवले. केंद्र सरकारचा निर्णय घटनात्मक होता की नाही, यावर आता सर्वोच्च न्यायालयानेही निर्णय दिला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्यता दिली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घेऊन कलम ३७० हटवण्याचा निर्णय रोखून धरण्याची भाजपची रणनीती असेल. आश्वासनांची पूर्तता करणाऱ्या पक्षाची प्रतिमा आणखी मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. हा एक मद्दा आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा ठरू शकतो.

३) ओबीसी/महिला/युवा मतदारांवर लक्ष - जात जनगणनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष भाजपला कोंडीत पकडत आहेत. विरोधकांच्या रणनीतीला तोंड देण्यासाठी आता भाजपची रणनीती ओबीसी चेहऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच त्यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर भर देण्याची असेल.

महिला आरक्षण, उज्ज्वला योजना आणि जन धन खात्याच्या मदतीने महिला मतदारांना आकर्षित करण्याची रणनीती असेल, तर पक्ष तरुणांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेणार आहे. (Marathi Tajya Batmya)

४) योजनांच्या लाभार्थ्यांवर लक्ष - भाजपने विविध योजनांच्या लाभार्थ्यांची व्होट बँक तयार केली आहे. केंद्र आणि राज्य सरकार राबवत असलेल्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांवर भाजपचे लक्ष असून विकास भारत संकल्प यात्रेसारख्या यात्रा याच रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जात आहे.(Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा भाजपचे इतर नेते, प्रत्येकजण मोफत रेशनसह अशा सरकारी योजनांबद्दल वारंवार बोलत असतो, ज्यांचा समाजातील एका मोठ्या वर्गाला फायदा होतो. अनेक योजनांमध्ये थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश निवडणुकीत लाडली बहना योजनेच्या यशामुळे थेट रोख हस्तांतरणाचे महत्त्व पुन्हा एकदा प्रस्थापित झाले आहे.

५) मोदींची गॅरंटी - काँग्रेसने हा आपल्या निवडणुकीच्या रणनीतीचा अविभाज्य भाग बनवला, तर भाजपने त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपला सर्वात मोठा चेहरा पुढे केला.

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निवडणूक सभांमध्ये मोदींच्या गॅरंटीवर भर दिला आहे. लोकसभा निवडणुकीत खुद्द मोदीच चर्चेचा विषय ठरले. गेल्या मिवडणुकीवेळी वापरलेल्या पॅटर्ननुसार लोक मोदींच्या चेहऱ्यावर मतदान करतात हे दिसून येते. अशा परिस्थितीत यावेळी पीएम मोदींच्या चेहऱ्यासोबत मोदींच्या गॅरंटीची खेळी ट्रम्प कार्ड ठरू शकते हे आताच्या निवडणुकीत दिसून आले आहे.(Latest Marathi News)

६) हिंदुत्वावर भर - 'भाजपने सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास'चा नारा दिला आहे, पण हिंदुत्वाच्या धर्तीवर पक्ष पुढे जाणार हे राज्याच्या निवडणुकांवरूनही स्पष्ट झाले आहे. भाजपने पूर्ण अनेक मुद्दे ताकदीने मांडले. छत्तीसगडमध्येही हिंदुत्वाला धार देण्याची रणनीती भाजपसाठी कामी आली.यामुळे ध्रुवीकरण होणार असून त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, असेही बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील १३१०९ मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT