नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान मोदी आणि सरकारमधील मंत्र्यांना शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएने 2014 आणि 2019 नंतर सलग तिसऱ्यांदा निवडणुका जिंकल्या आहेत. शपथविधीनंतर कोणत्या मंत्र्यावर कोणत्या खात्यांची जबाबदारी सोपवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होती. राजकीय वर्तुळातील प्रत्येकजण वेगवेगळे अंदाज बांधत होती. ती यादी आता समोर आली आहे. काही नेत्यांकडे आधीचीच महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्री आहेत. 24 राज्यांतील खासदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. यामध्ये अनुभवी नेत्यांसह कमी वयाच्या खासदारांचाही समतोल साधण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.
१) नरेंद्र मोदी - पंतप्रधान
कॅबिनेट मंत्री
२) राजनाथसिंह - संरक्षण मंत्रालय
३) अमित शहा - गृह मंत्रालय
४) नितीन गडकरी - रस्ते वाहतूक मंत्रालय
५)एस. जयशंकर- परराष्ट्रमंत्री
६) शिवराजसिंह चौहान- कृषी व शेतकरी कल्याण आणि पंचायत व ग्रामीण विकास मंत्रालय
७) निर्मला सीतारामन - अर्थ मंत्रालय
८) जे.पी नड्डा- आरोग्य मंत्रालय
९) मनोहर लाल खट्टर- ऊर्जा आणि शहरी विकास मंत्रालय
१०) एच. डी. कुमारस्वामी- अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रालय
११) पियुष गोयल- उद्योग आणि वाणिज्य मंत्रालय
१२) धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्रालय
१३) जीतनराम मांझी- सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
१४) राजीवरंजन सिंह (लल्लन सिंह) (जेडीयू)
१५) सर्वानंद सोनोवाल- बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय
१६) डॉ. वीरेंद्र कुमार- सामाजिक न्याय मंत्रालय
१७) किंजरापू राममोहन नायडू- नागरी विमान वाहतूक
१८ ) प्रल्हाद जोशी- ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय
१९) ज्योएल ओरांग- आदिवासी व्यवहार मंत्रालय
२०) गिरीराज सिंह- वस्त्रोद्योग मंत्री
२१) अश्विनी वैष्णव- रेल्वेमंत्री
२२) ज्योतिरादित्य शिंदे- ईशान्य (नॉर्थ इस्ट) विकास आणि दूरसंचार मंत्रालय
२३) भूपेंद्र यादव- पर्यावरण मंत्रालय
२४) गजेंद्रसिंह शेखावत- सांस्कृतिक पर्यटन
२५) अन्नपूर्णा देवी- महिला व बालविकास मंत्रालय
२६) किरेन रिजीजू- संसदीय कामकाज
२७) हरदीपसिंह पुरी- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
२८) डॉ. मनसुख मांडवीय- कामगार मंत्रालय
२९) जी. किशन रेड्डी- कोळसा आणि खाण मंत्रालय
३०) चिराग पासवान- क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय
३१) सी. आर. पाटील- जलशक्ती मंत्रालय
३२) राव इंद्रजितसिंह- पर्यटन राज्य मंत्रालय
३३) डॉ. जितेंद्र सिंह- विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
३४) अर्जुन राम मेघवाल- कायदा आणि न्याय मंत्रालय
३५) प्रतापराव जाधव- आयुष, आरोग्य आणि कुटुंब नियोजन मंत्रालय
३६) जयंत चौधरी- कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय
३७) जितीन प्रसाद- वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय; इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
३८) श्रीपाद येसू नाईक- ऊर्जा आणि शहरी विकास मंत्रालय
३९) पंकज चौधरी- अर्थ मंत्रालय
४०) कृष्णपाल गुर्जर- सहकार मंत्रालय
४१) रामदास आठवले- सामाजिक न्याय मंत्रालय
४२) रामनाथ ठाकूर- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
४३) नित्यानंद राय- गृह मंत्रालय
४४) अनुप्रिया पटेल- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
४५) व्ही. सोमण्णा- रेल्वे मंत्रालय
४६) डॉ. पेमासानी चंद्रशेखर- ग्रामीण विकास मंत्रालय
४७) एस. पी. सिंह बघेल- मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय
४८) शोभा करंदलजे- कामगार आणि रोजगार मंत्रालय
४९) कीर्तीवर्धन सिंह- पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय
५०) बी. एल. वर्मा- ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय
५१) शांतनू ठाकूर- बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय.
५२) सुरेश गोपी- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
५३) डॉ. एल. मुरुगन- संसदीय कामकाज मंत्रालय.
५४) अजय टमटा- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
५५) बंडी संजयकुमार- गृह मंत्रालय.
५६) कमलेश पासवान- ग्रामीण विकास मंत्रालय
५७) भागीरथ चौधरी- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
५८) सतीशचंद्र दुबे- खाण मंत्रालय.
५९) संजय सेठ- संरक्षण मंत्रालय
६०) रवनीत सिंह बिट्टू- रेल्वे मंत्रालय
६१) दुर्गादास उईके- आदिवासी व्यवहार मंत्रालय
६२) रक्षा खडसे- क्रीडा आणि युवक कल्याण
६३) सुकांत मुजुमदार- पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय
६४) सावित्री ठाकूर- महिला आणि बाल विकास मंत्रालय
६५) तोखन साहू- गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय.
६६) राजभूषण चौधरी- जलशक्ती मंत्रालय
६७) भूपतीराजू श्रीनिवास वर्मा- अवजड उद्योग मंत्रालय
६८) हर्ष मल्होत्रा- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
६९) निमूबेन बांभनिया- ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय
७०) मुरलीधर मोहोळ- सहकार आणि नागरी उड्डाण
७१) जॉर्ज कुरियन - मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय
७२) पवित्र मार्गारिटा- परराष्ट्र मंत्रालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.