Narendra Modi esakal
देश

Narendra Modi : असा असावा 'कर्तव्यनिष्ठ पंतप्रधान'! आईच्या निधनानंतरही PM मोदींनी केली कामाला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचं आज पहाटे निधन झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचं आज पहाटे निधन झालं आहे.

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) कोलकाता (Kolkata) येथील हावडा न्यू-जलपाईगुडी वंदे भारत एक्सप्रेसला गांधीनगर राजभवन येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला.

पंतप्रधान या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजेरी लावणार होते, पण त्यांच्या आईचं आज सकाळी अहमदाबादमध्ये निधन झालं, त्यामुळं त्यांना त्यांचा कोलकाता दौरा रद्द करावा लागला. मात्र, आईच्या अंत्यसंस्काराच्या विधीला उपस्थित राहिल्यानंतर मोदींनी थेट गांधीनगर राजभवन गाठलं आणि व्हीसीच्या माध्यमातून कोलकाता येथील कार्यक्रमाशी संपर्क साधला.

हावडा स्टेशनवर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होते. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पंतप्रधानांच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान मोदींना कार्यक्रम लवकर संपवून विश्रांती घेण्यास सांगितलंय.

कोलकाता मेट्रोच्या पर्पल लाइनच्या जोका-तरातला सेक्शनचं पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमधूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केलं. याशिवाय, त्यांनी न्यू जलपाईगुडी रेल्वे स्टेशन पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणीही केली. पश्चिम बंगालमधील विविध रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणीही त्यांनी केली.

यावेळी मोदी म्हणाले, आज मला तुम्हा सर्वांना भेटायचं होतं, पण वैयक्तिक कारणांमुळं मी तुम्हाला भेटू शकलो नाही. याबद्दल मी माफी मागतो. देशाच्या स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’मध्ये देशानं 475 ‘वंदे भारत ट्रेन’ सुरू करण्याचा संकल्प केला होता. आज यापैकी एक 'वंदे भारत' हावडा ते न्यू जलपाईगुडीला जोडणारा सुरू झाला आहे.

आज 30 डिसेंबर या तारखेला इतिहासात महत्त्व आहे. 30 डिसेंबर 1943 रोजी नेताजी सुभाष यांनी अंदमानमध्ये तिरंगा फडकवून भारताच्या स्वातंत्र्याचा ध्वज उभारला होता. 2018 मध्ये या कार्यक्रमाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मी अंदमानला गेलो होतो. नेताजींच्या नावावरही एका बेटाला नाव देण्यात आलं, असं त्यांनी सांगितलं.

21 व्या शतकात भारताच्या जलद विकासासाठी भारतीय रेल्वेचा वेगवान विकास आणि सुधारणा आवश्यक असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. भारतीय रेल्वेचं आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकार विक्रमी गुंतवणूक करत आहे. आता वंदे भारत एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, हमसफर एक्सप्रेस सारख्या आधुनिक गाड्या भारतात तयार जात आहेत, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT