PM Narendra Modi 
देश

PM Modi at Krishna’s Dwarka: दिव्य अनुभव.. पंतप्रधान मोदींनी पाण्यातील द्वारका नगरीचे घेतले दर्शन; शेअर केले फोटो

पंतप्रधान मोदी यांनी द्वारका नगरीला भेट दिली. द्वारका नगरी पाण्यात बुडाल्याचा लोकांची श्रद्धा आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात दौरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी द्वारका नगरीला भेट दिली. द्वारका नगरी पाण्यात बुडाल्याचा लोकांची श्रद्धा आहे. या पाण्यातील नगरीचे दर्शन पंतप्रधान मोदींनी घेतले आहे. मोदींनी एक्सवर काही फोटो पोस्ट करुन याची माहिती दिली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी पाण्यातील द्वारका नगरीचे दर्शन घेतल्यानंतर आपला अनुभव कथन केला आहे. ते म्हणाले की, हा अद्भूत अनुभव आहे. पाण्यात बुडालेल्या द्वारका नगरीचे दर्शन घेण्याचा हा पवित्र अनुभव आहे. वेळेचे बंधन नसलेल्या आणि गतकाळातील आध्यात्मिक भव्यतेशी जोडून घेतला आहे. भगवान कृष्ण सगळ्यांना आशीर्वाद देतील अशी इच्छा व्यक्त करतो.(PM Narendra Modi Goes Underwater To Pray at Submerged City of Dwarka)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, पुरातन द्वारका नगरी ही भगवान श्रीकृष्णाची आहे. द्वारका कधीकाळी भव्यता आणि प्रगतीची प्रतिक होती. पंतप्रधान मोदी यांनी द्वारकाधीश मंदिराचे दर्शन घेतले आहे. त्यांची ही भेट ऐतिहासिक ठरली आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

SCROLL FOR NEXT