नवी दिल्ली : ‘एमपी के मन में मोदी’ या टॅगलाइननंतर ‘आता मोदी की गॅरंटी’ असल्याचा दावा करीत भाजपने मध्य प्रदेशातील मतदारांना वीस घोषणांची हमी दिली. भोपाळ येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज संकल्पपत्र जाहीर केले. ‘लाडली बहना’ या योजनेअंतर्गत महिलांना पक्के घर देण्याचे आश्वासनही देण्यात आले.
१७ नोव्हेंबरला मध्य प्रदेशात मतदान होणार आहे. केवळ एक आठवडा राहिलेला असताना भाजपने मतदारांसाठी ‘भाजप का भरोसा’ असल्याचे म्हटले आहे. भाजप जी आश्वासने देते, ती पूर्ण केली जातात. हा भाजपचा ट्रॅक रेकॉर्ड असल्याचा दावा जे. पी. नड्डा यांनी केला.
ते म्हणाले, गेल्या वीस वर्षात भाजपने जी आश्वासने दिली. ती पूर्ण केल्यामुळेच विकास दिसून येत आहे. २००३ मध्ये मध्य प्रदेशचा औद्योगिक विकास दर ०.६१ टक्के एवढा होता. तो आता २०२३ मध्ये २४ टक्के एवढा झाला आहे. २००३ मध्ये सिंचनाचे क्षेत्र केवळ ४ हजार हेक्टर होते. हे क्षेत्र १६ हजार हेक्टर झाले आहे. (Latest Marathi News)
भाजपची प्रमुख आश्वासने-
गव्हाला प्रति क्विंटल २७०० रुपये दर आणि धानाची प्रति क्विंटल खरेदी ३१०० रुपयांनी.
किसान सन्मान निधी व किसान कल्याण योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये
मुख्यमंत्री जन आवास योजनेअंतर्गत प्रत्येकाला घर
‘लाडली बहना’ योजनेसोबत महिलांना पक्के घर बांधून देण्यात येणार.
प्रत्येक कुटुंबातील किमान एकाला नोकरी किंवा स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध.
ग्रामीण भागातील १५ लाख महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाईल.
लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत जन्मापासून मुलींना २१ वर्षांपर्यंत २ लाख रुपये देण्यात येईल.
गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे ‘केजी’ ते ‘पीजी’पर्यंतचे शिक्षण मोफत.
अनुसूचित जमातीच्या सशक्तीकरणासाठी ३ लाख कोटी रुपयांची तरतूद.
तेंदूपत्ता प्रति पोते ४ हजार रुपयांनी खरेदी.
अनुसूचित जमातीच्या भागात वैद्यकीय महाविद्यालय.
आयआयटी व एम्सच्या धर्तीवर राज्यात शिक्षण संस्था.
राज्यात सहा नवीन एक्स्प्रेस वे बांधण्यात येईल.
आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी २० हजार कोटींची गुंतवणूक
भाजपच्या २९ हजार घोषणांचे काय? - काँग्रेस
भाजपच्या संकल्पपत्रावर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता रागिणी नायक यांनी या घोषणा ‘हवा हवाई’ असल्याचे म्हटले आहे. १८ वर्षात शिवराजसिंह चौहान यांनी २९ हजार घोषणा केल्या आहेत. या घोषणांचे काय झाले, अशी विचारणा त्यांनी केला.
मध्य प्रदेशवर ४ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. दर दिवसाला मध्य प्रदेशात १८ बलात्कार होतात. या प्रदेशात ३९ लाख बेरोजगार आहेत. कुपोषण व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मध्य प्रदेश राज्य अग्रस्थानी आहे. ही वस्तुस्थिती असताना भाजपचे हे घोषणापत्र म्हणजे गेल्या १८ वर्षात भाजपने या राज्याच्या विकासासाठी काहीच केले नाही, याची कबुली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.