PM Modi in Ayodhya 
देश

PM Modi in Ayodhya: अयोध्येला पुन्हा एकदा वैभवाच्या शिखरावर घेऊन जायचंय; मोदींचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास कामांच्या लोकार्पणासाठी अयोध्येमध्ये आले आहेत. यावेळी अयोध्येधाम रेल्वे स्टेशन आणि महर्षी वाल्मिकी विमानतळाचे लोकार्पण केल्यांनंतर जनतेला संबोधित केले

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास कामांच्या लोकार्पणासाठी अयोध्येमध्ये आले आहेत. यावेळी अयोध्येधाम रेल्वे स्टेशन आणि महर्षी वाल्मिकी विमानतळाचे लोकार्पण केल्यांनंतर जनतेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, अयोध्येला पुन्हा एकदा वैभवाच्या शिखरावर घेऊन जायचं आहे. येत्या काळात अयोध्ये संपूर्ण उत्तर प्रदेशला दिशा दाखवेल. (pm Narendra modi in ayodhya ram mandir speech railway station and airport inauguration)

आज अयोध्येत १५ हजार कोटी रुपयांच्या योजनांचे लोकार्पण करण्यात आले. आधुनिक सुविधांनी रेल्वे स्थानक सुसज्य झालंय. विकास गाठायचा असेल तर आपली संस्कृती जपायलाच हवी. आपली संस्कृती-परंपरा आपल्या प्रेरणा देते, मार्ग दाखवते. पुरातन आणि नुतन भारताला घेऊन आपण पुढे जात आहोत, असं मोदी म्हणाले.

अयोध्येत राम लल्ला टेंटमध्ये होते. आता राम लल्लाला पक्के घर मिळालं आहे, तसेच ४ कोटी जनतेला देखील घर मिळालं आहे. देशात ३० हजारपेक्षा जास्त पंचायत भवन बनवले जात आहेत. केदारधामच नाही तर ३५० पेक्षा जास्त मेडिकल देखील बनवले जात आहेत, अशी माहिती मोदींनी दिली.

पुरातन मुर्तींना देखील देशात मोठ्या प्रमाणात परत आणत आहोत. पंरपरेचा उत्सव अयोध्येत होईल. काही दिवसांनी येथे संस्कृतीची भव्यता आपल्याला दिसून येईल. २१ व्या शतकात आपण भारताला पुढे घेऊन जाऊ. प्राचिन काळात अयोध्या कशी होती याचा महर्षी वाल्मिकींनी उल्लेख केला आहे. महान अयोध्या धन-धान्याने पूर्ण होती. समृद्धीच्या शिखरावर होती आणि आनंदाने भरलेली होती. वैभव शिखरावर पोहोचले होते. तीच पुरातन वैभवता परत आणायची आहे, असं मोदी म्हणाले.

येणाऱ्या काळात संपूर्ण अयोध्या उत्तर प्रदेशला दिशा दाखवेल. राम मंदिर तयार झाल्यानंतर प्रचंड संख्येने भाविक येत राहतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अयोध्येमध्ये विकास कामे केले जात आहेत. महर्षी वाल्मिकींनी आपल्या महाकाव्याद्वारे रामाचे गुणकिर्तन केले आहे. प्रमु रामांनी देखील महर्षी वाल्मिकींबाबत गौरवोद्गार काढले होते. त्यामुळे अयोध्या विमानतळाचे नाव महर्षी वाल्मिकी झाले असल्याचा आनंद आहे, असं मोदी म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: मेट्रोचा दरवाजा उघडला अन् बाहेर पडणाऱ्या प्रत्येक पुरुषाला पोलिसांनी चोप-चोप चोपलं, काय घडलं असं नेमकं ?

Gold Seized In Pune: पुण्यात सापडलेलं १३८ कोटींचं सोनं कोणाचं? कुठून कुठे निघाला होता टेम्पो? पोलिसांनी सगळंच सांगून टाकलं

Latest Maharashtra News Updates Live : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर पक्षाचे नेते महाराष्ट्राच्या CEC बैठकीसाठी AICC मुख्यालयात दाखल

CID Teaser: ठरलं! CID चा दुसरा सीझन येणार; टीझरमध्ये दिसणाऱ्या कलाकारांना ओळखलंत का?

IPL 2025 Auction: LSG फ्रँचायझी नाही, तर केएल राहुलच रिटेन्शनची ऑफर नाकारणार? नवे अपडेट्स आले समोर

SCROLL FOR NEXT