pm narendra modi  sakal
देश

PM Modi in USA: २०० वर्षांपूर्वीच्या हॉटेलमध्ये होणार मोदींचा अमेरिका मुक्काम; रुमचं एका दिवसाचं भाडं माहित आहे का?

वैष्णवी कारंजकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी अमेरिकेच्या दौऱ्यावर पोहोचले. योग दिनाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी वॉशिंग्टन डीसीला रवाना होतील. २२ जून रोजी वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान मोदींचं व्हाईट हाऊसमध्ये भव्य स्वागत होणार आहे.

 त्यांच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान वॉशिंग्टन डीसीमधील प्रसिद्ध हॉटेल विलार्ड इंटरकॉन्टिनेंटलमध्ये मुक्काम करतील. हे अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध हॉटेल्सपैकी एक आहे. चला जाणून घेऊया विलार्ड इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलबद्दल...

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेणार आहेत. यासोबतच मोदींच्या सन्मानार्थ व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनरही होणार आहे.

 विलार्ड इंटरकॉन्टिनेंटल, जिथं पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) मुक्काम करतील, हे वॉशिंग्टन डीसी मधल्या व्हाईट हाऊसजवळ आहे. या आलिशान हॉटेलमध्ये परदेशी पाहुणे आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पाहुण्यांसाठी राहण्याची व्यवस्था केली जाते. ही बहुमजली इमारत व्हाईट हाऊस आणि शहराच्या मध्यभागी प्रसिद्ध पेनसिल्व्हेनिया अव्हेन्यूवरील जागतिक युद्ध स्मारकाजवळ आहे.

विलार्ड इंटरकॉन्टिनेंटलचा 200 वर्षांहून अधिक काळ अमेरिकेचे अध्यक्ष, मान्यवर आणि इतर देशांतील प्रसिद्ध व्यक्तींना होस्ट करण्याचा समृद्ध इतिहास आहे. सामाजिक आणि कॉर्पोरेट इव्हेंटसाठी हे मुख्य भेटीचं ठिकाण आहे. २२,००० चौरस फुटांहून अधिक इव्हेंट स्पेससह, हॉटेलमध्ये १९ मीटिंग रूम आहेत.

विलार्ड इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल १८१६ मध्ये अस्तित्वात आलं. खरं तर, कॅप्टन जॉन टेलोने १४ व्या स्ट्रीट आणि पेनसिल्व्हेनिया अव्हेन्यूच्या जवळ एक भव्य घर बांधलं, ज्याचं नंतर हॉटेलमध्ये रूपांतर झालं. नंतर कॅप्टन टेलोने नवीन हॉटेल बांधण्यासाठी ते जोशुआ टेनिसनला भाड्याने दिलं.

अनेक दशकांमध्ये, इमारतीची मालकी आणि त्याचं नाव अनेक वेळा बदललं. अखेरीस १८५० मध्ये हेन्री आणि एडविन विलार्ड यांनी संपूर्ण ब्लॉक विकत घेतला आणि त्याला विलार्ड्स सिटी हॉटेल असं नाव दिलं. १९४६ मध्ये नवीन मालकांना विकण्यापूर्वी विलार्ड्सने हॉटेल पुढील चाळीस वर्षे चालवलं. त्यानंतर हॉटेलची दुरवस्था झाली आणि १९६० च्या दशकात ते बंद झालं.

 पेनसिल्व्हेनिया अव्हेन्यू डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हॉटेल पाडण्यापासून रोखण्यासाठी पावलं उचलली. त्याचवेळी पुनर्बांधणीनंतर हॉटेलचं व्यवस्थापन इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल्स ग्रुपकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुन्हा एकदा हे ऐतिहासिक हॉटेल १९८६ मध्ये द विलर्ड इंटरकॉन्टिनेंटल म्हणून सुरू करण्यात आलं.

विलार्ड इंटरकॉन्टिनेंटल हे वॉशिंग्टनमधील सामाजिक आणि राजकीय घडामोडींचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. प्रसिद्ध लेखिका ज्युलिया वॉर्ड होवे यांनी हॉटेलमध्ये राहून तिचे 'द बॅटल हाइमन ऑफ द रिपब्लिक' हे आयकॉनिक गाणं लिहिलं. जवळपास एक शतकानंतर, मार्टिन ल्यूथर किंग जूनियर यांनी त्यांचं प्रसिद्ध 'आय हॅव अ ड्रीम' भाषण इथंच लिहिलं.

प्रतिष्ठित ऐतिहासिक हॉटेलमध्ये राहिलेल्या इतर अनेकांमध्ये लेखक मार्क ट्वेन, कवयित्री एमिली डिकिन्सन, लेखक चार्ल्स डिकन्स, अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष अब्राहम लिंकन, ४२ वे यूएस अध्यक्ष बिल क्लिंटन, ४४ वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि इतर अनेकांचा समावेश आहे.

 हे हॉटेल राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांचं केंद्र राहिलं आहे. पंतप्रधान मोदीही त्यांच्या अमेरिका दौऱ्यात इथं आले आणि राहिले. जून २०१७ मध्ये, पंतप्रधान मोदींनी वॉशिंग्टनमधील हॉटेल विलार्ड इंटरकॉन्टिनेंटल येथे जगातील सर्वोच्च २१ कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली.

यामध्ये गुगलचे सुंदर पिचाई, अॅमेझॉनचे जेफ बेझोस, अॅपलचे टिम कुक आणि वॉलमार्टचे डग मॅकमिलन यांचा समावेश होता. यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये मोदी या हॉटेलमध्ये आले आणि इथं थांबले. यादरम्यान त्यांनी अनेक परदेशी नेते आणि अमेरिकन सीईओंची भेट घेतली होती.

 या हॉटेलमध्ये एकूण ३३५ खोल्या आहेत. या खोल्यांना नेव्ही ब्लू, ग्रे, आयव्हरी आणि गोल्ड कलर टच असे रंग देण्यात आले आहेत. या हॉटेलच्या क्लासिक खोल्यांचं एका दिवसाचं भाडं सुमारे ३६०-३९० डॉलर्स म्हणजे सुमारे २६,००० ते २९,००० रुपये आहे.

दुसरीकडे, या हॉटेलच्या सुइट्स रुमचं भाडं सुमारे ४५ हजार रुपयांपासून सुरू होते. हॉटेलच्या प्रत्येक खोलीत एक किंग बेड किंवा दोन क्वीन बेड असतात. यासोबतच आकर्षक सोफा, लाईट, पॉवर आऊटलेट, वर्क डेस्क, कॉफी मशीन आदी बसविण्यात आले आहेत.

 या हॉटेलच्या ऐतिहासिक क्रिस्टल रूम, बॉलरूम आणि विलार्ड रूमची स्वतःची खासियत आहे, जिथे संपूर्ण गोपनीयतेची देखील काळजी घेतली जाते. हॉटेलमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या अनेक बैठक खोल्या आहेत, ज्या त्यांच्या गरजेनुसार वापरल्या जाऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Ravindra Jadeja: मांजरेकरांनी पुन्हा जडेजाच्या बॅटिंगवर केली पोस्ट, यावेळी काय म्हटलंय? वाचा

Latest Marathi News Live Updates : लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT