PM Narendra Modi Team eSakal
देश

PM मोदी आज पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये; 16 लाख महिलांना देणार मोठं गिफ्ट

महिनाभरात मोदींचा उत्तर प्रदेशमध्ये आज दहावा दिवस असणार आहे.

सुधीर काकडे

आगामी काळातील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly elections 2021) पार्श्वभूमीवर केंद्र उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी भाजप (BJP) दंड थोपटून मैदानात उतरल्याचं दिसतंय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तर प्रदेशमधील दौऱे वाढले आहेत. मागच्या काही दिवसांत उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) दौऱ्यानंतर आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे महिलांना मोठी भेट देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी प्रयागराजला भेट देणार असून, दोन लाखांहून अधिक महिलांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. उत्तर प्रदेश सरकारने याबाबत माहिती दिली आहे. गेल्या एका महिन्यात पंतप्रधान मोदींचा उत्तर प्रदेशमध्ये दहावा दिवस असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेनुसार हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. पंतप्रधान बचत गटांच्या खात्यात 1000 कोटींची रक्कम हस्तांतरित करणार (Cash Scheme) आहेत. ज्यामुळे सुमारे 16 लाख महिला सदस्यांना याचा फायदा होणार आहे.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी भाजपच्या निवडणूक प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतल्याचं दिसतं आहे. उत्तर प्रदेशामध्ये पुढच्या दोन महिन्यांच्या आत निवडणुका होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Uddhav Thackeray: सरकार कुणी पाडलं, राज ठाकरेंबरोबर जाणार का? उद्धव ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT