उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह (Kalyan Singh) यांचे शनिवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांनी 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
लखनऊ- उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह (Kalyan Singh) यांचे शनिवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांनी 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. प्रकृती फारच बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, 21 ऑगस्टला त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांचे अंत्यसंस्कार 23 ऑगस्टला सोमवारी अलीगडमध्ये करण्यात येणार आहे. रविवारी कल्याण सिंह यांचे पार्थिव विधानभवनमध्ये आणि नंतर भाजप कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्यासह अनेक भाजप नेते आपल्या नेत्याला अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी लखनऊ येथे आले आहेत. (National Latest News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण सिंह यांचे अखेरचे दर्शन घेतले. त्यांनी कल्याण सिंहांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'आम्ही एका सामर्थ्यवान नेत्याला गमावलं आहे. आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहू. कल्याण सिंह यांच्या परिवाराला हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो, अशी प्रार्थना मी भगवान रामाकडे करतो.' भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हेही मोदींसोबत उपस्थित होते. कल्याण सिंह यांचे पार्थिव दुपारी दोन वाजता अलीगडला नेण्यात येईल, त्यानंतर 23 ऑगस्टला गंगा किनारी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ट्विट करत कल्याण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली होती. दु:खाच्या या क्षणी माझ्याकडे शब्द नाहीत. कल्याण सिंह मातीशी जोडले गेलेले एक मोठे आणि कुशल नेता होते. त्यांचे व्यक्तिमत्व महान होते. उत्तर प्रदेशाच्या विकासात त्यांचे योजदान मोठे आहे. दु:खाच्या या वेळी माझ्या संवेदना त्यांना परिवारासोबत आहेत, असं मोदी म्हणाले.
भारताची सांस्कृतिक पंरपरा समृद्ध करण्यासाठी कल्याण सिंह यांची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशाची प्रत्येक पीढी त्यांच्या या योगदानासाठी त्यांची ऋणी असेल. आपल्या शतकांपासून जुन्या असलेल्या परंपरांवर त्यांना गर्व होता. कल्याण सिंह कमकूवत आणि वंचित वर्गाच्या कोट्यवधी लोकांचा आवाज होते. त्यांनी शेतकरी, तरुण आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न केले. त्यांचे समर्पण आणि सेवाभाव लोकांना प्रेरणा देत राहील, असंही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.