Mann ki Baat Esakal
देश

Mann ki Baat: महिला शक्ती, राम मंदिर, आरोग्य..वर्षाच्या पहिल्या 'मन की बात'मध्ये PM मोदींनी कोणत्या मुद्द्यांचा केला उल्लेख?

PM Modi Mann ki Baat: पंतप्रधान मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित करतात. मन की बातचा हा १०९ वा भाग आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी 28 जानेवारी) मन की बात या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. प्रजासत्ताक दिनापासून ते राममंदिर प्राणप्रतिष्ठेपर्यंतच्या सर्व गोष्टींबद्दल ते आजच्या कार्यक्रमात बोलले. या वर्षी आपल्या राज्यघटनेला 75 वर्षे कशी पूर्ण झाली हे पंतप्रधानांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी शुभेच्छाही दिल्या. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी कर्तव्य पथावरील महिला सक्षमीकरणावरही भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमात सांगितलं की, दोन दिवसांपूर्वी आपण सर्व देशवासीयांनी 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला. या वर्षी आपल्या राज्यघटनेलाही ७५ वर्षे पूर्ण होत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयालाही ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या लोकशाहीचे हे सण भारताला 'मदर ऑफ डेमोक्रेसी' म्हणून अधिक बळकट करतात. सखोल विचारमंथनातून संविधान तयार करण्यात आले असून त्याला जिवंत दस्तावेज म्हटले जाते. राज्यघटनेच्या तिसऱ्या प्रकरणात नागरिकांच्या हक्कांची माहिती आहे.

प्रभू रामाचे शासन संविधान निर्मात्यांसाठी प्रेरणादायी होते: पंतप्रधान मोदी

प्रभू रामाचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की, संविधानाच्या तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला आपल्या संविधानाच्या निर्मात्यांनी भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मणजी यांच्या चित्रांना स्थान दिले होते. प्रभू रामाचे शासन हे आपल्या संविधानाच्या निर्मात्यांसाठीही प्रेरणास्थान होते आणि म्हणूनच 22 जानेवारीला अयोध्येत मी 'देव ते देश', 'राम ते राष्ट्र' या विषयावर बोललो होतो. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने देशातील कोट्यवधी लोकांना एकत्रित आणले.

22 जानेवारीला दिवाळी साजरी केली: पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 22 जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण देशाने रामज्योती पेटवून दिवाळी साजरी केली. मी देशातील जनतेला मकर संक्रांती ते २२ जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्याची विनंती केली होती. लोक त्याच्याशी जोडलेले आहेत. लोकांनी मला फोटोही पाठवले. मंदिरांच्या स्वच्छतेची भावना थांबू नये, ही मोहीम थांबू नये, सामूहिकतेची ही शक्ती आपल्या देशाला यशाच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल असेही ते पुढे म्हणाले.

कर्तव्य पथावर महिला शक्तीचे दर्शन: पंतप्रधान मोदी

प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, यावेळी 26 जानेवारीची परेड अतिशय अप्रतिम होती, परंतु सर्वात जास्त चर्चा झाली ती परेडमधील महिला शक्तीची. कर्तव्य पथावर, केंद्रीय सुरक्षा दल आणि दिल्ली पोलिसांच्या महिला तुकड्यांनी कूच करायला सुरुवात केली तेव्हा सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून आला. परेडमध्ये निघालेल्या 20 पथकांपैकी 11 पथके केवळ महिलांची होती. बाहेर आलेल्या झांकीमध्ये सर्व कलाकार महिला होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमात दीड हजार मुलींनी सहभाग घेतला होता, असंही पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT