Narendra Modi eSakal
देश

PM Modi: इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत सनातन धर्म नष्ट करण्याचा संकल्प झाला; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

कार्तिक पुजारी

PM Modi on Sanatan Dharma

भोपाळ- सनातन धर्म आणि डीमके नेता उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी यावेळी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. इंडिया आघाडीची मुंबईत बैठक झाली. यावेळीच विरोधकांमध्ये सनातन धर्माला संपवण्याचा संकल्प झाला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधकांना सनातन धर्म संपवून पुन्हा भारताला गुलामगिरीमध्ये घेऊन जायचं आहे. मध्य प्रदेशच्या बिनामध्ये मोदी आले आहेत. यावेळी त्यांनी पेट्रोकेमिकल कॉम्पलेक्सची पायाभरणी केली. या प्रोजक्टमुळे मध्य प्रदेशात १ लाख रोजगार निर्माण होणार असल्याचं सांगितलं जातं.

देश जी-२० परिषद यशस्वी झाल्याचा उत्सव सादर करत आहे. दुसरीकडे विरोधक आपली संस्कृती संपवण्याची योजना बनवत आहेत. जगामध्ये भारत विश्व मित्र म्हणून समोर येत आहे. भारत जगाला जोडण्याचे सामर्थ्य ठेवतो. दुसरीकडे काही लोक विभाजणाच्या प्रयत्नात गुंतले आहेत, अशी टीका मोदींनी केली.

घमेंडिया आघाडी

विरोधकांनी इंडिया आघाडी बनवली आहे. ज्याला काही लोक घमेंडिया असंही म्हणतात. याला नेता नाही, नेतृत्व कोण करेल याबाबत संभ्रम आहे. त्यांनी मुंबईमध्ये एक बैठक घेतली. त्यांनी आपला छुपा अजेंडा ठरवला आहे. भारताच्या संस्कृतीवर हल्ला करणे, भारताच्या आस्थेवर वार करणे अशी यांची नीती आहे. ज्या संस्कार आणि परंपरेने आपण जोडले गेलो आहोत ते नष्ट करण्याचा त्यांचा डाव आहे, अशी कडवट टीका त्यांनी केली.

गांधींचा सनातन धर्म

अहिल्याबाई होळकर यांनी सनातन धर्माकडून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य केले. देशाच्या आस्थेची सुरक्षा केली. इंडिया आघाडीने ही पंरपरा नष्ट करण्याची योजना आखली आहे. सनातन धर्माची ताकत होती, ज्याने राणी लक्ष्मीबाई यांना 'मैं झांसी नही दूंगी' म्हणण्याची प्रेरणा दिली. ज्या सनातन धर्माला गांधींनी आयुष्यभर पाळलं, भगवान रामाने त्यांना आयुष्यभर प्रेरणा दिली. त्यांचे शेवटचे शब्द देखील हे राम होते, असं ते म्हणाले.

गुलामीत ढकलण्याचा डाव

हे घमेंडिया लोक या सनातन धर्माला संपवू पाहत आहेत. येणाऱ्या काळात असे हल्ले आणखी वाढतील. त्यामुळे सनातनी आणि देशप्रेमी लोकांनी जागरुक राहावं असं आवाहन मोदींनी केलं. स्वातंत्र्यासाठी जे वीर शहीद झाले त्यांची पुन्हा भारत मातेच्या उदरातच मला जन्म मिळो अशी इच्छा होती. संत रविदास, माता शबरी, महर्षी वाल्मिकी हे सनातन धर्माचे प्रतिक आहेत. याच सनातन धर्माने हजारो वर्ष लोकांना जोडून ठेवलं. विरोधकांना तेच आता छिन्नविछिन्न करायचं आहे, अशी टीका त्यांनी केली. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : ...अन्यथा थेट कार्यक्रम करेन; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

Donald Trump: रिपब्लिकन पक्षाचा नेता अमेरिकेचा राष्ट्रध्यक्ष झाला; आठवलेंनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, भारत...

Mephedrone Case : मेफेड्रोन उत्पादन प्रकरणाचा खटला सुरू; ललित पाटीलसह २२ आरोपींवर गुन्हा दाखल

Video: “कोण आहेत हे, यांचं नाव घेऊन ठेवा”; मविआच्या सभेपूर्वी उद्धव ठाकरे पोलिसांवर भडकले

Yuvraj Singh, मोहम्मद कैफसह तेंडुलकरही आयपीएल लिलावात उतरणार; जाणून घ्या किती आहे मूळ किंमत ?

SCROLL FOR NEXT