देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून लाल किल्ल्यावरून दहाव्यांदा देशाला संबोधित केलं आहे. ७६ व्या स्वातंत्र्यदिनाचे पंतप्रधानांचे भाषण ८३ मिनिटांचे होते.
तर २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८६ मिनिटांचे भाषण करून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाचा रेकॉर्ड मोडला होता. पण आत्तापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत फक्त एका वेळी एका तासापेक्षा कमी वेळेचे भाषण केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ सालच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी त्यांच्या ८६ मिनिटांच्या भाषणाचा रेकॉर्ड तोडून सर्वांत मोठे म्हणजे तब्बल ९६ मिनिटांचे भाषण केले होते. तर २०१७ साली त्यांनी ५६ मिनिटे भाषण केलं होतं. हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत कमी वेळाचं भाषण होतं. पण यावर्षी त्यांनी लाल किल्ल्यावर ८९ मिनिटांचे भाषण केले आहे.
कोणत्या वर्षी किती मिनिटांचे केले भाषण
वर्षे - भाषणाची वेळ
२०१४ - ६५ मिनिटे
२०१५ - ८६ मिनिटे
२०१६ - ९६ मिनिटे
२०१७ - ५६ मिनिटे
२०१८ - ८२ मिनिटे
२०१९ - ९३ मिनिटे
२०२० - ८६ मिनिटे
२०२१ - ८८ मिनिटे
२०२२ - ८३ मिनिटे
२०२३ - ८९ मिनिटे
संसदेतही सर्वांत जास्त वेळ भाषण करण्यात मोदीच अव्वल
लोकसभेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांत जास्त वेळ म्हणते २ तास १३ मिनिटे आणि ५३ सेकंदाचे भाषण करून त्यांनी आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. १९६५ मध्ये माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत २ तास १२ मिनीटे भाषण केलं होतं. मात्र मोदींनी 2 तास १३ मिनिटे 53 सेकंद भाषण करून सर्व विक्रम मोडीत काढले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.