नवी दिल्ली- राज्यसभेतील राष्ट्रपतींच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. त्यामुळे मोदी लोकसभेत काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने भारताचा संकल्प शक्ती दिसून आली. त्यांच्या अभिभाषणामुळे अनेकांमध्ये उर्जा निर्माण झाली, असं ते म्हणाले.
लाईव्ह अपडेट-
-हे लोक फक्त बोलण्यावर लक्ष देतात, कृती करण्यावर यांचा भर नसतो. लिंग समानतेवर भाष्य करणारे लोक, तिहेरी तलाकला विरोध करतात. आम्ही विरोधात होतो तेव्हा कधी विकासाला विरोध केला नाही. विरोधक विकासाच्या मुद्द्यावर काही बोलत नाहीत. त्यांना विकासाच्या मुद्यावर चर्चा करायची नाही. पूल, रस्ते, इंटरनेट, सोलार उर्जा, वायू उर्जा या क्षेत्रात भारताने प्रचंड प्रगती केली आहे. भारत संतुलित विकासाकडे जात आहे, असं मोदी म्हणाले.
-दहशतवादी, नक्षलवादी, विभाजनवादी लोकांच्या सुटकेची मागणी करणे म्हणजे शेतकरी आंदोलनाला कलंकीत करण्याचे काम आहे.
-देशातील शेतकऱ्यांना विकासाच्या संधी मिळणार आहेत. त्यांची उन्नती व्हावी यासाठी कृषी कायदे आणण्यात आले आहेत. एमएसपी आणि बाजार समित्या कायम राहणार आहेत. पण, यावरुन शेतकऱ्यांनी दिशाभूल केली जात आहे. मनमोहन सिंग सरकारच्या काळात अशा प्रकारचे कायदे आणले जाणार होते. शरद पवार यांचेही या कायद्यांना समर्थन होते. पण, ते आता आम्ही आणलेल्या कायद्यांना विरोध करत आहेत. त्यांमुळे त्यांच्या हेतूविषयी शंका येते. शेतकऱ्यांना असत्य सांगितलं जात आहे, असं मोदी म्हणाले.
केंद्र सरकार शेतकऱ्यांचा आदर करते. त्यामुळेच वरिष्ठ मंत्री शेतकऱ्यांशी सातत्याने चर्चा करत आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्वावे. कृषी कायद्यातील सुधारणांबाबत चर्चा केली जाईल, असं मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदींनी यावेळी काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांना सुनावलं. अधिर रंजन जी, आता हे जास्त होत आहे. मी तुमचा आदर करतो. तुम्हाला चांगली प्रसिद्धी मिळेल, काळजी नको. हे चांगलं दिसत नाही. तुम्ही हे का करत आहेत, असं मोदी म्हणाले. विरोधत मोदींच्या भाषणावेळी कृषी कायद्याच्या मु्द्द्यावरुन गोंधळ घालत होते.
काँग्रेससह विरोधी पक्षांनी कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुन घोषणाबाजी केली. मोदीच्या भाषणावेळी काळे कायदे वापस घ्या, अशा घोषणा देण्यात आल्या. भाषणावेळी विरोधकांनी सभात्याग केला आहे.
कृषी कायद्यांवर बोलताना मोदी म्हणाले की, अध्यादेश आणि त्यानंतर संसदेत कायदे मंजूर करुन घेण्यात आले आहेत. नवे कायदे आणल्यामुळे कोणतीही बाजार समिती बंद पडलेली नाही. एमएसपी संपलेली नाही. विरोधक सत्य लपवत आहेत. कृषी सुधारणा देशासाठी महत्त्वाच्या आणि गरजेच्या आहेत. काँग्रेस कायदे काळे किंवा पांढरे या मुद्द्यावर भांडत आहे. पण त्यांनी कायद्यांमधील तरतूदीवर वाद-विवाद घातलेल्या बरा, असं मोदी म्हणाले.
कोरोना महामारीमुळे जग बदलले आहे. अशावेळी जगापासून वेगळे राहणे फायद्याचे नाही. आपल्याला एक शक्तीशाली देश म्हणून समोर यावं लागेल. त्याचमुळे सरकार आत्मनिर्भर भारतासाठी प्रयत्न करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यादृष्टीने देशाने प्रगती केली पाहिजे, असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी भाषण करताना कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी सभापतींनी खासदारांना शांततेचं आवाहन केलं. मोदी राज्यसभेत बोलताना शेतकरी कायद्यांचे समर्थन करताना म्हटलं की , आंदोलनजीवी जमात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जे घडलं नाही त्याची भीती दाखवली जात आहे. कायदे लागू झाल्यानंतर हे होईल, ते होईल असं म्हणत भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.