नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी त्यांनी संदेशखाली येथील पीडित महिलांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. यावेळी आपल्यावर सोसाव्या लागलेल्या यातना त्यांनी कथन केल्या. दरम्यान, मोदींच्या या भेटीवरुन ते राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. (PM Narendra Modi Sandeshkhali visit knowing suffering of women victims tragedy)
महिलांना पंतप्रधानांनी शेअर केलं दुःख
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधानांनी उत्तर २४ परगाना जिल्ह्यातील बशीरहाटमध्ये एका सभेला संबोधित केलं. सध्या चर्चेत असलेलं संदेशखाली हे ठिकाणही याच जिल्ह्यात येतं. त्यामुळं मोदींनी या दौऱ्यात संदेखालीतल्या पीडित महिलांची भेट घेतली. यावेळी पीडित महिलांनी मोदींशी आपलं दुःख शेअर केलं. त्यांचं म्हणणं पंतप्रधानांनी शांतपणे ऐकून घेतलं, अशी माहिती भाजपच्या नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी दिली आहे. (Latest Marathi News)
काय आहे संदेशखाली प्रकरण?
संदेशखाली इथल्या मागासवर्गीय महिलांच्या जमिनी त्यांना धमकावून लैंगिक अत्याचार करुन बळकावण्यात आल्या. गेल्या चार वर्षांपूर्वीपासून वारंवार हा प्रकार घडला आहे. इथल्या नागरिकांच्या रेशन कार्डमध्ये देखील गैरव्यवहार करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून गावातील नागरिकांना अनेक सुविधांपासून देखील वंचित ठेवल्याची माहिती समोर आली आहे. (Marathi Tajya Batmya)
त्यामुळं संदेशखालीतील नागरिकांनी आंदोलन करत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. या महिलांनी पोलिसांत तक्रारी दिल्यानंतरही त्या मागे घेण्यासाठी या ग्रामस्थांना धमकल्याचा प्रकार इथं घडला आहे. तृणमूल काँग्रेसचा बाहुबली नेता शेख शहाजहाँ याच्याकडून हे कृत्य करण्यात आलं आहे.
प्रमुख आरोपीला अटक
दरम्यान, या घटनेतील प्रमुख आरोपी तृणमूल काँग्रेसचा बाहुबली नेता शेख शहाजहाँ याला पश्चिम बंगाल पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली. २४ परगना जिल्ह्यातील मिनाखन परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं. ५५ दिवस फरार झाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. शहाजहां सध्या सीबीआयच्या ताब्यात असून सीबीआयनं त्याच्यावर तीन गुन्हे दाखल केले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.