देश

Manmohan Singh: PM मोदींचा थेट मनमोहन सिंगांना फोन; दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन्...

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज ९१ वा वाढदिवस आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज ९१ वा वाढदिवस आहे. यानिमित्त जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील माजी पंतप्रधानांना थेट फोन करुन शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. (PM Narendra Modi spoke on phone with former PM Manmohan Singh today and wished him on his birthday)

जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव

सकाळी पंतप्रधानांनी ट्विटरवरुन मनमोहन सिंग यांना शुभेच्छा दिल्या. "मनमोहन सिंगजी यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्याची कामना करतो" असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं. पण नंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना थेट फोन करुन विचारपूस केली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. (Latest Marathi News)

व्हिलचेअरवरुन संसदेत लावली हजेरी

वयाची नव्वदी पार केल्यानं आता मनमोहन सिंग यांची प्रकृती ठीक नसते, व्हिलचेअरवरुनच त्यांचं दैनंदिन कामकाज सुरु असतं. काही दिवसांपूर्वी राज्यसभेतही मनमोहन सिंग यांनी व्हिलचेअरवरुनच हजेरी लावली होती.

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतच्या विधेयकावर मतदानासाठी मनमोहन सिंगांनी हजेरी लावली होती. त्यांचा हा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण पक्षाची गरज लक्षात घेता त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं होतं. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: ''ते' पुस्तक मी वाचणार अन् माझ्या वकिलांनाही देणार'', ईडीच्या भीतीबाबत भुजबळांचा पत्रकार परिषदेत खुलासा

Aligarh Muslim University ला अल्पसंख्याकांचा दर्जा, सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

मगरी, शार्क असलेल्या नदीत पडले Ian Botham; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने वाचवले अन्यथा...

Latest Maharashtra News Updates : विद्यार्थ्यांना तीनदा देता येणार ‘जेईई ॲडव्हान्स’ परीक्षा

Sawantwadi Election : शिवसेनेच्या उमेदवारीवर नारायण राणे शेवटचे लढले, अटीतटीची 'ती' निवडणूक ठरली लक्षवेधी

SCROLL FOR NEXT