Dr. bharat Balvalli, narendra modi and abhijit pawar sakal
देश

Bharatvakya Book Publication : ‘भरतवाक्य’चे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांच्या स्वरांची आणि आयुष्याची ओळख करून देणाऱ्या ‘भरतवाक्य’ या पुस्तकाचे प्रकाशन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार हे उपस्थित होते.

‘भरतवाक्य’ या ग्रंथात डॉ. बलवल्ली यांचे प्रखर सांगीतिक सिद्धांत, आध्यात्मिक तत्त्वे आणि सामाजिक कार्यांचे आत्मकथन आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि भारतीय अध्यात्मशास्त्राबद्दलच्या इतिहासाचे ज्ञान आजच्या तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे पुस्तक उपयोगी ठरणारे आहे.

डॉ. बलवल्ली यांनी संगीत तपश्चर्येतून केलेले कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या या जीवन प्रवासातील अनुभवांचे वर्णन यात आहे. संगीत आणि अध्यात्म यांच्यातील दुवा सांधणारे हे आत्मकथन आहे. डॉ. बलवल्ली यांची जीवनकथा मानवी चित्ताचे सशक्तीकरण करणारी आणि प्रेरणादायी आहे. ‘सकाळ प्रकाशना’तर्फे हा स्वरग्रंथ प्रकाशित केला आहे.

पुस्तकाविषयी...

पुस्तकाचे शब्दांकन आणि संपादन सुप्रसिद्ध अभिनेता आणि पटकथा लेखक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केले असून चित्रकार वासुदेव कामत यांनी आकर्षक मुखपृष्ठ तयार केले आहे. डॉ. घनश्याम बोरकर यांच्या काव्यरचना यामध्ये असून सुलेखनकार अच्युत पालव यांनी या कवितांचे अक्षरांकन केले आहे. अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे पुस्तक मराठीमध्येही तयार केले आहे.

पुण्यात कार्यक्रम

कोजागरी पौर्णिमेनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे बुधवारी (ता. १६) ‘स्वरसंध्या’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायक स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांची मैफील या वेळी रंगणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता पुण्यातील बोगनवेल फार्म्स, डीपी रोड, कर्वेनगर येथे कार्यक्रम होईल.

स्वामी समर्थ यांचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून स्वीकारण्याचे भाग्य मला लाभले. हे मी कायम जपणार आहे...त्यांचे उदात्त विचार आणि शिकवण कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आली आहे. त्यांचा आपल्या समाजाप्रती असलेला दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024 : भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात; पाकिस्तानने विश्वासाला तडा दिला, आपला संघ बाहेर गेला

Sharad Pawar Video : "८४ होवो, ९० होवो हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

कोअर कमिटीची 4 तास बैठक; भाजप उमेदवार कधी निश्चित करणार? मिटींगनंतर तारीख सांगितली, जाणून घ्या...

अतुल यांच्या निधनानंतर व्हायरल होतोय त्यांचा जगणं शिकवणारा व्हिडिओ; म्हणालेले- समोरच्यासाठी आपण काय आहोत...

IAS Promotion: राज्यातील 23 अपर जिल्हाधिकारी बनले 'आयएएस'; पुण्यातील 4 जणांचा समावेश

SCROLL FOR NEXT