Narendra Modi  
देश

Narendra Modi : वाराणसीमध्ये PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक! तरुणाने ताफ्यासमोर मारली उडी

रवींद्र देशमुख

PM Narendra Modi Varanasi Security Breach: वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रुद्राक्ष केंद्रावरून विमानतळाकडे रवाना झाले. त्यावेळी एका तरुणाने त्यांच्या ताफ्यासमोर उडी मारली.

ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाडीपासून अवघ्या 10 फूट अंतरावर घडली. हे पाहताच पोलीसांनी धावत जाऊन तरुणाला पकडले. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

ताब्यात घेण्यात आलेला तरुण हा गाझीपूर जिल्ह्यात राहणारा भाजपचा कार्यकर्ता आहे. भारतीय लष्करात नोकरीच्या मागणीबाबत त्याला पंतप्रधानांची भेट घ्यायची होती. याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र झडतीदरम्यान एसपीजीला तरुणाकडे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कार्यक्रमाचे ओळखपत्र सापडले.

पीएम मोदींच्या सुरक्षेत चूक होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी जवळपास 9 वेळा त्यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्या आहेत. 30 एप्रिल रोजी कर्नाटकातील म्हैसूरमध्ये रोड शो दरम्यान पीएम मोदींच्या दिशेने मोबाईल फेकण्यात आला होता. यापूर्वी १९ जानेवारीला मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील व्हीव्हीआयपी परिसरात ३८ वर्षीय व्यक्ती घुसली होती. फिरोजपूरमध्ये पीएम मोदींचा ताफा 15-20 मिनिटांसाठी फ्लायओव्हरवर थांबला होता. शेतकऱ्यांनी पुढे रास्ता रोको केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Disqualification Case: शिवसेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मिळाला मुहूर्त; या तारखेला होणार सुनावणी

Latest Marathi News Updates : स्थानिकांनी घातला धारावी पोलीस ठाण्याला घेराव

Cha.Sambhajinagar: मराठवाड्यात काँग्रेस असणार मोठा भाऊ? या जागांवर केला दावा

Tirumala Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये आढळले जनावराची चरबी अन् माशांचं तेल; 'या' पद्धतीने ओळखा तूपाची शुद्धता

Bigg Boss Marathi 5 Voting Trends: सुरजला जान्हवीने दिली टक्कर तर 'या सदस्याला मिळालेत सगळ्यात कमी वोट्स; कोण होणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT