देश

PM मोदींनी केली सेंट्रल विस्टा प्रकल्पाची एक तास पाहणी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच आपल्या अमेरिका दौऱ्यावरुन परतले आहेत. त्यानंतर आल्या आल्याच ते कामाला लागले आहेत. आज रात्री 8.45 च्या सुमारास नवी दिल्लीतील नवीन संसदेच्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी गेले. त्यांनी जवळपास एक तास त्या ठिकाणी घालवला आणि नवीन संसदेच्या इमारतीच्या बांधकामाच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवन इमारतीचे भूमीपूजन झाले होते. भूमीपूजनानंतर सर्व धर्मांच्या धर्मगुरुंकडून प्रार्थना करण्यात आली होती. सुमारे 64500 चौरस मीटर जागेवर ही इमारत तयार होणार असून यासाठी सुमारे 971 कोटी रुपये खर्च येणार आहे. नव्या संसद भवनच्या सभागृहात लोकसभेच्या सदस्यांसाठी 888 खासदारांसाठी आसनव्यवस्था असेल. याशिवाय राज्यसभा सदस्यांसाठी 326 हून अधिक आसन असणार आहेत. येथे 1224 सदस्यांची बसण्याची व्यवस्था देखील असेल. याशिवाय प्रत्येक सदस्यासाठी 400 स्क्वेअर फूटचे कार्यालयही या नवीन इमारतीत असेल. जुन्या संसदेपेक्षा नवीन संसद सुमारे 17 हजार चौरस मीटर मोठे आहे.

वादग्रस्त सेंट्रल विस्टा

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बराच वादग्रस्त ठरला आहे. कोरोनाच्या त्सुनामीमुळे राजधानीत हाहा:कार उडालेला असताना नव्या संसदेचे बांधकाम २४ तास अखंड आणि वेगाने सुरू होतं आणि आहे. दिल्लीभर कडक लॉकडाउन असताना नवीन संसदेच्या कामासाठी शेकडो मजूर बस भरभरून आणले गेले होते. देश आर्थिक हलाखीतून जात असताना हजारो कोटींची ही उधळपट्टी तत्काळ थांबवण्याची वाढती मागणी झाली होती. संसद भवन आणि सेंट्रल विस्टा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानले जातात. नगर विकास मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पाचा प्राथमिक खर्च सुमारे २२ हजार कोटी रुपये आणि महागाई धरून ३७ हजार कोटींपर्यंत जाणार आहे. सेंट्रल विस्टा प्रकल्प कोणत्याही स्थितीत २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राज्यसभेत व्यक्त केला होता. आरोग्याप्रमाणेच या बांधकामालाही अत्यावश्यक सेवेच्या श्रेणीत केंद्र सरकारने टाकल्याचेही उघड झाले आहे. यानुसार नवीन संसद भवन परिसरात २४ तास काम सुरू असल्याचे संबंधित कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

विरोधकांची टीका, उधळपट्टी कशाला?

नवीन संसदेसाठी खर्च होणारा कोट्यवधींचा पैसा ऑक्सिजन आणि इतर कोरोना उपचारांसाठी वापरा अशी मागणी काँग्रेस नेतृत्वाने याआधी केली होती. मोठमोठी, भव्यदिव्य भवने भविष्यात अनेक निर्माण करता येतील. मात्र अर्थव्यवस्थाच सुदृढ नसेल तर ही सेंट्रल विस्टाची उधळपट्टी आणि तीही प्रतिकूल काळात कशासाठी चालू ठेवण्यात आली आहे, असा सवाल राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी उपस्थित केला होता. अशा प्रकारचे अनावश्यक आणि अनैतिक काम सुरू ठेवणारा देश जगात एकही नसेल, असाही हल्ला झा यांनी चढवला होता. एका व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेपोटी प्रतिकूल परिस्थितीत हा कोट्यवधीचा अनाठायी खर्च कशासाठी केला जात आहे, असा सवाल माकपने आपल्या मुखपत्रात अनेकदा उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT