Modi Govt. 9 Years esakal
देश

9 Years Of Modi Govt. : दबंग पंतप्रधान! मोदींनी 9 वर्षात केलेले 9 साहस ज्यामुळे जगाला केले चकित

आधी कोणत्याही पंतप्रधानांनी केले नाही असे, पंतप्रधान मोदी यांचे ९ साहसी प्रयोग

धनश्री भावसार-बगाडे

PM Narendra Modi's 9 Adventures : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून ९ वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी भारतीय जनत पक्षाला मोठा विजय मिळून त्यांचं सरकार अस्तित्वात आलं होतं. या 9 वर्षांत पीएम मोदींनी परराष्ट्र धोरणापासून अनेक महत्त्वाच्या योजनांपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जगभरात त्यांना एक दिग्गज नेता म्हणून तर ओळखतातच शिवाय त्यांना एक साहसी पंतप्रधान म्हणूनही ओळखलं जातं.

मग यात मॅन व्हर्सेस वाइल्ड मध्ये बेयर ग्रिल्स सोबत जंगलात एक दिवस घालवणं असो किंवा कुनो मधला सफारी लुक याची जगभर चर्चा झाली. असेच त्यांचे 9 चकीत करणारे साहसी कामे बघूया.

Modi Govt. 9 Years

मॅन व्हर्सेस वाइल्ड मध्ये पीएम मोदी

पंतप्रधान मोदी जेव्हा मॅन व्हर्सेस वाइल्ड या डिस्कव्हरी चॅनलवरच्या फेमस शोमध्ये दिसले, त्यावेळी सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. यात ते बेयर ग्रिल्स सोबत अॅडव्हेंचर करताना दिसले. हा एपिसोड 12 ऑगस्ट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात मोदी बेयर ग्रिल्स सोबत निसर्ग आणि वैयक्तीक जीवन या विषयावर चर्चा करताना दिसले. याची शुटिंग उत्तराखंडाच्या झीम कार्बेट नॅशनल पार्कमध्ये झाली होती. मोदी हे भारताचे असे पहिले पंतप्रधान होते ज्यांनी अशा साहसी शो मध्ये सहभाग घेतला होता. जिथे हे शुटिंग झाले त्या भागात 250 वाघ असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितले होते. लोकांची या एपिसोडला फार पसंती मिळाली होती.

Modi Govt. 9 Years

कुनोत पीएम मोदी

पीएम मोदींनी 2022मध्ये साधारण 75 वर्षांनी देशात चित्त्यांना परत आणले. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात देशाच्या मधोमध असणाऱ्या कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण अफ्रीकाच्या नामीबिया इथून 8 चित्ते भारतात आणले गेले. यावेळी मोदींचा सफारी लुक बघून सगळेच थक्क झाले होते. त्यांनी स्वतः आपल्या कॅमेऱ्याने चित्त्यांचे फोटो काढले.

कर्नाटकात पीएम मोदींनी स्वतः वाजवला पारंपरिक ढोल

पंतप्रधान मोदी वेळोवेळी देशाच्या विविध भागांत दौरा करत असतात. नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकीच्या दौऱ्या दरम्यान त्यांनी असं काही केलं की, ज्याचा कोणी विचारही केलेला नव्हता. त्यांनी एका सभेत चक्क कर्नाटकाचा पारंपरिक ढोल वाजवला. याचा व्हिडीओही व्हायरल झाला. ज्यात मोदी स्मीत करत ढोल वाजवताय आणि लोक उभे राहून टाळ्या वाजवत आहेत. यापूर्वीही मोदींना पारंपरिक वाद्या वाजवताना बघितलं गेलं आहे.

Modi Govt. 9 Years

इंडोनेशियात मोदींचा जलवा

मागच्या वर्षी 2022मध्ये इंडोनेशियाच्या बालीत आयोजित जी-20 शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव बघायला मिळाला. मोदींचे स्वागत पारंपरिक वाद्य यंत्र ड्रम वाजवून करण्यात आलं. लोक कलावंत तो वाजवत असताना मोदींनी न राहून स्वतः ते वाद्य वाजवून बघितलं. मोदींना ड्रम वाजवताना बघून लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

मोदींचा जंगल सफारी लुक

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कर्नाटक दौऱ्या दरम्यान प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त बांदीपूर टायगर रिझर्वचा दौरा केला. तिथे त्यांनी केलेल्या जंगल सफारी लुकने सर्वच थक्क झाले. तिथे ते वेगळ्याच वेषात दिसले. इथल्या फोटोंत ते खाकी कलरची पँट, प्रिंटेट हाल्फ स्लीव्ह शर्ट आणि खाकी हाफ जॅकेट, डोक्यावर सफारी कॅप घालून दिसले. इथे त्यांनी स्वतः कॅमेऱ्याने वाघांचे फोटोही काढले.

Modi Govt. 9 Years

नेपाळमध्ये वाजवलं संगीत वाद्य

पीएम मोदी यांनी आपल्या अनेक परदेश यात्रांमध्ये तेथील संगीत वाद्ये वाजवली आहेत. त्यांचा प्रादेशिक वेष आणि वाद्य वाजवणे लोकांना फार आवडते. 2018 मध्ये नेपाळ दौऱ्यावर गेल्यावर जनकपूरमध्ये भजनादरम्यान स्वतः संगीत वाद्य वाजवलं. नेपाळच्या या पारंपरिक वाद्य यंत्राला झाल म्हटलं जातं.

जपानमध्ये जगाने पहिल्यांदाच पीएम मोदींचा बघितला अलग अंदाज

2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर मोदी जपान दौऱ्यावर गेले. एका कार्यक्रमात त्यांच स्वागत लोक कलावंतांनी ड्रम वाजवून केलं. जगासोबत भारतानेही मोदींचा हा वेगळाच अंदाज पहिल्यांदा पाहिला होता. त्यानंतर त्यांनी अनेक परदेश दौऱ्यात वेगवेगळे वाद्य वाजवून लोकांना चकीत केले.

Modi Govt. 9 Years

पीएम मोदींचा आर्मी लुक

मेड इन इंडिया टँक अर्जून मार्क 1A वर पंतप्रधान मोदी स्वार झालेले बघून दुश्मनांचेही धाबे दणाणले. यात त्यांचा अगदी वेगळाच आर्मी लुक बघायला मिळाला. यापूर्वी त्यांचा अजून एक फोटो व्हायरल झाला होता त्यात ते सेनेची वर्दी घालून टँकवर स्वार झाले होते. कोरोना काळात पीएम मोदी यांची वाढलेली दाढी आणि काळा चष्मा असा त्यांचा वेष बघून सगळेच त्यांची प्रशंसा करत होते.

मंगोलिया दौरा

2015 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी मंगोलियाचा दौरा केला होता. ज्यामुळे त्यांना जगात एक वेगळीत ओळख मिळालीय त्यांनी तिथे पारंपरिक कपडे घालून मिनी नादम फेस्टिवलमध्ये वाद्य योची देखील वाजवलं. सोशल मीडियावर हे फोटो फार व्हायरल झाले. जे बघून प्रत्येक जण त्यांचं कौतुक करत होतं. मंगोलियातून पीएम मोदींना रेसचा घोडा आणि वाद्य भेट मिळालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT