PM Narendra Modi Esakal
देश

PM Narendra Modi: 'दहशतवाद्यांना पाठिंबा देणारा देश आज सगळ्या जगाला मदत मागत आहे'; पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला नाव न घेता टोला

अंकिता खाणे (Ankita Khane)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप समिट 2023 ला संबोधित केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर नाव न घेता टोला लगावला आहे. जे देश भारतावर दहशतवादी हल्ल्यांना पाठिंबा देत होते त्यांना आता जगाला वाचवण्याचे आवाहन करणे भाग पडले आहे, असे पंतप्रधान मोदी बोलताना म्हणालेत.

"दहशतवादी हल्ल्यांनंतर भारत जगाला मदतीसाठी आवाहन करत होता... आता या हल्ल्यामागे असलेले देश जगाला वाचवण्याचे आवाहन करत आहेत," असे पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यापासून 2014 पर्यंत भारत मानसिक अडथळ्यांचा बळी होता. ते म्हणाले की, या अडथळ्यांमुळे भारताला स्वातंत्र्यानंतर हवी ती प्रगती साध्य करता आली नाही.

"भारत प्रत्येक अडथळे तोडत आहे आणि चंद्राच्या पृष्ठभागाच्या त्या भागावर उतरला आहे जिथे कोणीही पोहोचले नाही... मोबाईल निर्मितीमध्ये भारत आघाडीवर आहे. स्टार्ट-अपमध्ये भारत पहिल्या तीनमध्ये आहे," असेही पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले.

'नुसत्या घोषणांनी गरिबीवर मात करता येत नाही, तर उपायांनी लढता येते', असेही ते म्हणालेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत 2014 पासून मानसिक अडथळे तोडत आहे.

"बर्‍याच काळापर्यंत आम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. आक्रमणे आणि वसाहतवादाने आम्हाला अडथळ्यांना समोरे जावे लागले. स्वातंत्र्य चळवळीने अनेक अडथळे तोडले. स्वातंत्र्यानंतर ही गती कायम राहील, असे वाटले होते, पण तसे झाले नाही. भारताला ते शक्य झाले नाही. भारत आपल्या पूर्ण क्षमतेने प्रगती करू शकला नाही",असंही ते पुढे म्हणालेत.

मोदी पुढे म्हणाले की, "अनेकांना त्यांच्या सरकारच्या जन धन खाते योजनेवर शंका होती. बँका केवळ श्रीमंतांसाठीच आहेत असे मानणाऱ्या गरीब लोकांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्यात ही योजना यशस्वी ठरली."

"एसी रूममध्ये राहणाऱ्या लोकांना गरीब लोकांचे मानसिक सशक्तीकरण कधीच समजणार नाही," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या त्यांच्या सरकारच्या निर्णयाचेही पंतप्रधान मोदींनी स्वागत केले. ते म्हणाले की, या मेगा मूव्हपासून खोऱ्यातील दहशतवाद कमी होत आहे.

“कलम 370 रद्द केल्यानंतर, दहशतवाद संपत आहे आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटन वाढत आहे,” असंही त्यांनी पुढे नमुद केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजना सरकारनं तुर्तास थांबवली! काय आहे कारण? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

JioCinema: जिओ सिनेमा लवकरच बंद होणार! मुकेश अंबानी घेऊ शकतात मोठा निर्णय; काय आहे कारण?

Local Train Derailed : मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT