नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी आणखी एक पत्र लिहून आप सरकारच्या कामगिरीवर टीकास्त्र सोडल्याने "आप विरुद्ध नायब राज्यपाल" हा संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खुले पत्र पाठवून नायब राज्यपालांनी दिल्लीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले.
मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर नायब राज्यपाल सक्सेना यांनी याआधीही पत्राद्वारे आप सरकारवर शरसंधान केले आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात नायब राज्यपालांनी राज्य सरकारच्या मंत्र्यांवर असहकाराचा ठपका ठेवला होता. तर दिल्लीतील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटवर गेल्याचे ताशेरेही नायब राज्यपालांनी ओढले होते. या घटनाक्रमानंतर सत्ताधारी आपने दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर नायब राज्यपालांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खुले पत्र लिहून पाणीपुरवठ्याबाबत सरकारवर टीका केली आहे. ईशान्य दिल्ली भागात पाण्यासाठी झालेल्या भांडणात एका महिलेचा मृत्यू होणे हे राज्य सरकारचे अपयश असून दिल्लीतील पाणीप्रश्न उपस्थित करून मंत्री आतिशी यांनी मागील नऊ वर्षात सत्तेत असलेल्या आपल्याच सरकारला दोषी ठरवले आहे, असे ताशेरे नायब राज्यपालांनी या पत्रात ओढले.
मंत्री आतिशी यांचे पत्र आपल्याकडे मिळण्याआधीच माध्यमांकडे पोहोचल्याची नाराजीही नायाब राज्यपालांनी व्यक्त केली. दरम्यान, या खुल्या पत्राला मंत्री आतिशी यांनी प्रत्युत्तर देताना दिल्लीच्या पाणी समस्येसाठी नायब राज्यपालांनाच जबाबदार धरले आहे. काही दिवसांपूर्वी आतिशी यांनी नायब राज्यपालांना पत्र लिहून दिल्ली जल बोर्डाच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना हटविण्याची मागणी केली होती. या पत्राचा दाखला देत मंत्री आतिशी यांनी आरोप केला की कामांमध्ये अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर नायब राज्यपालांनी कारवाई न करता त्यांना प्रोत्साहन दिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.