police arrested man involved hubli violence during babri demolition karnataka ram Mandir Congress Vs BJP  
देश

Ayodhya Ram Mandir : राम मंदिर आंदोलनासंबंधीत ३१ वर्षांपूर्वीच्या केसमुळे पुन्हा वादंग; भाजपचे काँग्रेस सरकारवर गंभीर आरोप

रोहित कणसे

अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा पार पडणार आहे, यादरम्यान कर्नाटकमध्ये राम मंदिराशी संबंधीत ३१ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणावरून गदारोळ सुरू आहे. येथे ३१ वर्ष जुन्या प्रकरणाशी संबंधीत राम मंदिर आंदोलनातील कारसेवकाला अटक करण्यात आली आहे. यानंतऱ भाजपने कर्नाटक सरकारविरोधात आंदोलने सुरु केली आहेत.

भाजपचे म्हणणे आहे की काँग्रेस सरकार मुद्दाम कारसेवकांना त्रास देत आहे. त्यामुळे उद्या (३ जानेवारी) बंगळूरू येथे या अटकेच्या विरोधात आंदोलन केलं जाणार आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

१९९२ मध्ये जेव्हा बाबरी मशिद पाडण्यात आली त्यानंतर कर्नाटक येथील हुबळी येथे आंदोलन करण्यात आलं होतं. येथे झालेल्या हिंसाचारात ५० वर्षीय कारसेवक श्रीकांत पुजारी यांनी आरोपी बनवण्यात आलं होतं. या प्रकरणात ३१ वर्षांनंतर पुजारी यांना अटक झाली आहे. या अटकेच्या कारवाईनंतर भाजपकडून याचा विरोध होत आहे. एसडीपीआय आणि पीएफआय यांना मोकळ सोडून देणारे मुद्दाम ३१ वर्षांनंतर राम भक्ताला अटक करत आहेत असे भाजपचे म्हणणे आहे. राम मंदिर यांच्या डोळ्यात खुपत आहे म्हणून हे केलं जात आहे. याच्या विरोधात भाजपकडून संपूर्ण कर्नाटकात आंदोलना केलं जाणार आहे.

हे प्रकरण बऱ्याच दिवसांपासून हे प्रकरण प्रलंबित होतं आणि एका अभियानाअंतर्गत हे प्रकरण निकाली देखील काढण्यात आलं. मात्र आता तब्बल ३० वर्षानंतर या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

आरोपीवर दंगलीत सहभागी असल्याचा आरोप होता, तेव्हा तो २० वर्षाचा होता. या मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते सीटी रवी म्हणाले की, काँग्रेसला राम मंदिराची अडचणीचं वाटत आहे. त्यांना राम मंदिर एक काल्पनिक पात्र वाटत होतं. ३० वर्षांपूर्वी काही झाला आणि आता त्यावरून अटक करत आहेत, हे लोक एसडीपीआय किंवा पीएफआय च्या आरोपींना सोडून देतात पण राम भक्तांना अटक करतात.

दरम्यान या मुद्द्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया म्हणाले की, कोणी चूक केली तर आम्ही काय करावं? एखाद्याने गुन्हा केला तर त्याला आम्ही मोकळ सोडून द्यावं का? आमचं सरकार सगळी जुनी प्रकरणे निकाली काढेल. पोलीसांनी कायद्याला धरून काम केलं आहे. हे काही द्वेशाचं राजकारण नाहीये, कुठल्याही निर्दोष व्यक्तीला आम्ही अटक केलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT