Police encounter of a criminal with a reward of Rs 1 lakh In UP Esakal
देश

Encounter: आणखी एक एन्काउंटर! दोन जवानांची रेल्वेतून फेकून हत्या; एक लाखाचे बक्षिस असलेल्याला पोलिसांनी संपवले

आशुतोष मसगौंडे

उत्तर प्रदेश पोलीस सध्या मोठ्या कारवाया करताना दिसत आहे. यूपी एसटीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने एक लाख रुपयांचा पुरस्कार असलेला गुन्हेगार जाहिद उर्फ ​​सोनूला चकमकीत ठार केले आहे.

दिलदारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील जमानिया-दिलदारनगर रोडवर ही चकमक झाली. चकमकीत ठार झालेला गुन्हेगार दोन आरपीएफ हवालदारांच्या हत्येप्रकरणी वाँटेड होता. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच 6 आरोपींना अटक केली आहे.

2 जवानांच्या हत्येचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्ट रोजी गाझीपूरमध्ये दोन आरपीएफ जवानांची हत्या करण्यात आली होती.

गहमर पोलीस स्टेशन हद्दीतील बकानिया गावाजवळ दोन्ही आरपीएफ जवानांचे मृतदेह सापडले होते.

दोन्ही आरपीएफ कर्मचारी पीडीडीयू रेल्वे यार्ड पोलीस ठाण्यात तैनात होते आणि ते बारमेर एक्स्प्रेसने मोकामा प्रशिक्षण केंद्राकडे जात होते. त्यावेळी आरोपींनी आरपीएफ जवानांना बेदम मारहाण करून दोघांनाही ट्रेनमधून फेकून दिले होते.

यानंतर मुख्य सूत्रधार आणि एक लाख रुपयांचे बक्षीस असलेला जाहिद हा गहमर भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीनंतर यूपी एसटीएफ आणि गहमर पोलिसांनी आरोपींना घेरले तेव्हा आरोपींच्या बाजूने गोळीबार सुरू झाला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपींना गोळी लागली. यानंतर आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

चकमकीत ठार झालेला गुन्हेगार हा बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील फुलवारी शरीफ येथील रहिवासी होता. या चकमकीत दोन पोलीस हवालदारही जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Price Hike : तेलाच्या डब्यामागे 150 ते 200 रुपयांची वाढ; नवरात्रोत्सव, दिवाळीतही तेजीचा अंदाज

Stock Market vs Gold: सोने की शेअर बाजार, कोण करणार मालामाल? काय सांगतात तज्ज्ञ

Pune Rain: परतीच्या पावसानं पुण्यात दाणादाण! वाघोलीत धुंवाधार, पेठांमध्ये वाहनचालकांची कसरत

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात Asian Gamesचे गोल्ड जिंकले, पण ते भारताला पुढे पुन्हा जिंकता नाही येणार, कारण...

Latest Maharashtra News Updates Live : मनोज जरांगेंची प्रकृती प्रचंड खालावली, अंतरवाली सराटीत बायकांनी फोडला टाहो

SCROLL FOR NEXT