BJP MP Kirodi Lal Meena esakal
देश

BJP MP : पोलिसांकडून मला ठार मारण्याचा प्रयत्न, मारहाणीत कपडे फाटले; भाजप खासदाराचा आरोप

जयपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर शहीद जवानांच्या पत्नी धरणे धरत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जयपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर शहीद जवानांच्या पत्नी धरणे धरत आहेत आणि राज्यसभा खासदार किरोडी लाल मीना त्यांचं नेतृत्व करत आहेत.

जयपूर : पुलवामात शहीद (Pulwama Martyrs Jawan) झालेल्या 3 जवानांच्या पत्नी आणि कुटुंबियांसह राजस्थानची राजधानी जयपूर येथील शहीद स्मारकाजवळ (Martyrs Memorial) धरणे धरणाऱ्या भाजप खासदारांना गोविंदगड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

त्यानंतर आज खासदार किरोडी लाल मीणा (BJP MP Kirodi Lal Meena) यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना एसएमएस हॉस्पिटलमध्ये (SMS Hospital) रेफर करण्यात आलं. किरोडी लाल मीणा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी (Police) मला मारण्याचा प्रयत्न केल्याचं मीना यांनी सांगितलं.

जयपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर शहीद जवानांच्या पत्नी धरणे धरत आहेत आणि राज्यसभा खासदार किरोडी लाल मीना त्यांचं नेतृत्व करत आहेत. किरोडी लाल गेल्या 10 दिवसांपासून धरणे धरले असून अशोक गेहलोत (Ashok Gehlot) सरकारच्या विरोधात ते आंदोलन करत आहेत.

Pulwama Martyrs Jawan

दरम्यान, किरोडी लाल यांची प्रकृती खालावल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर किरोडी लाल यांनी पोलिसांवर गैरवर्तन केल्याचा आरोप केलाय. किरोडी मीना यांनी ट्विट केलंय, 'पोलिसांनी मला मारण्याचा प्रयत्न केला; पण मी तरुण, बेरोजगार आणि गरिबांच्या आशीर्वादानं वाचलो. मला दुखापत झाली आहे. गोविंदगड हॉस्पिटलमधून मला जयपूरच्या सवाई मानसिंग हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं आहे.'

यासोबतच त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटलंय, 'एका खासदारासोबत पोलिसांचं हे कसं वर्तन आहे? मला ताब्यात घेण्यासाठी धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. माझे कपडे फाडले. सरकारनं कान उघड ठेवून ऐकावं.. या हुकूमशाहीपुढं मी झुकणार नाही आणि थांबणारही नाही. कोणत्याही परिस्थितीत शहीद जवानांच्या वीर पत्नींना न्याय मिळवून देणार, असा निर्धार त्यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT