Uttatpradesh Politics Esakal
देश

Maharashtra Political Crisis:अजित पवारानंतर मिशन जयंत? महाराष्ट्रानंतर उत्तरप्रदेशमध्येही होणार 'खेला'

Political crisis may happen in UP: राष्ट्रीय लोक दल पक्षाचे नेते अजय चौधरी भारतीय जनता पक्षासोबत येऊ शकतात. रालोद सोबत आल्याने पश्चिम उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे वर्चस्व अजून मजबूत होईल. दिल्लीत केंद्रीय मंत्री आणि जयंत चौधरी यांच्यात बैठक झाली, ज्यानंतर या चर्चांना उधाण आले.

सकाळ डिजिटल टीम

Political Blunder may Happen in UP:महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय खेळ बघायला मिळाला. ज्यामध्ये विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यंत्री झाले. त्यांच्यामते, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ४० आमदारांचा पाठिंबा त्यांना आहे, जे भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा देत आहेत. अशातच, उत्तरप्रदेशमध्ये देखील असाच उलटफेर बघायला मिळू शकतो.

२०२२च्या विधानसभेच्या निवडणूकीत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोक दल पक्ष सोबत लढले होते. रालोद भाजपसोबत आल्याने भाजपची पश्चिम उत्तरप्रदेशमधील पकड मजबूत होईल. त्याचबरोबर दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमध्ये जाट मतदारांना आकर्षित करु शकतात.

काही सूत्रांच्यामते, रविवारी (दि.२ जुलै) दिल्ली येथे जयंत चौधरी यांनी एका केंद्रीय मंत्र्याची भेट घेतली. दोन तास चाललेल्या या भेटीत जयंत चौधरी यांच्या भाजपामधील प्रवेशावर चर्चा करण्यात आली. एवढचं नव्हे तर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही असा ईशारा दिला होता.

आठवले म्हणाले की महाराष्ट्रात जसा राजकीय भूकंप झाला, तसाच भूकंप बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये देखील होऊ शकतो. आठवले पुढे म्हणाले की, "पटना येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीत जयंत चौधरी आले नव्हते. ते अखिलेश यादव यांच्यावर नाराज आहेत आणि ते आमच्यासोबत येऊ शकतात. " जर जयंत चौधरीही भाजपासोबत आले, तर देशात दुसरा राजकीय भूकंप होईल.

अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांच्यात दुरावा

काही दिवसांपासून अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा जोर धरत होत्या. २०१९च्या लोकसभेच्या निवडणूपासून दोन्ही राजकीय पक्ष सोबत आहेत. मात्र, त्यांना जास्त यश मिळाले नाही. २०२२च्या विधानसभा निवडणूकांमध्ये देखील हे पक्ष सोबत लढले होते, यावेळीही त्यांच्या पदरी निराशा पडली.

१ जुलै या दिवशी अखिलेख यादव यांचा वाढदिवस होता. त्यादिवशी त्यांना योगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. मात्र, जयंत चौधरी यांनी त्यांना शुभेच्छा देणारं ट्वीट केलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT