A person from OBC community will become Chief Minister: PM Modi Esakal
देश

PM Modi:तेलंगणात मुख्यमंत्री ‘ओबीसी’च ! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आश्वासन

सकाळ डिजिटल टीम

Telangana Election: ‘‘तेलंगणात भाजप सत्तेवर आल्यास ओबीसी समाजातील व्यक्ती मुख्यमंत्री होईल,’’ असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिले. गेल्या काही दिवसांपासून ‘ओबीसीं’वरून तेलंगणात राजकीय वातावरण तापलेले आहे. तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान हाेत असून, मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.

काँग्रेसने जातिनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसींवरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांच्या ओबीसी मुद्द्यावरून गरिबी हीच एक जात असल्याचे तेलंगणात म्हटले होते. त्यावरून, गरीब हीच एक जात असेल तर पंतप्रधान ओबीसी असल्याचा दावा का करतात, असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला होता. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी आज भूमिका स्पष्ट केली.

पंतप्रधान मोदी यांनी आज तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्यानंतर तेलंगणातील मेहबूबाबाद व करीमनगर येथील प्रचार सभांमध्ये बोलताना काँग्रेस व ‘बीआरएस’वर टीका केली. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे फार्महाऊस मुख्यमंत्री असल्याचा टोला मोदी यांनी लगावला. तेलंगणमध्ये परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा संगम असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी केले. ते म्हणाले, ‘‘तेलंगणात आम्ही ज्या हमी दिल्या आहेत त्या पूर्ण होणाऱ्या आहेत. (Latest Marathi News)

‘बीआरएस’ किंवा काँग्रेससारख्या आमच्या हमी हवेत विरून जाणाऱ्या नाहीत. तेलंगणात भाजपला सत्ता मिळाल्यानंतर ओबीसी समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात येईल.’’ काँग्रेसने माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना आदराची वागणूक दिली नसल्याचा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी केला. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobikwik IPO: मोबिक्विकला ७०० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीची मान्यता

Mumbai Metro 3: मुंबईतल्या पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रोचं काम पूर्ण; थांबे, तिकीट अन् मार्ग.. जाणून घ्या सर्वकाही

Kannad Crime : फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थीं-विद्यार्थींनींना सहा गुंडाकडून रस्त्यावर दगडी फरशीने मारहाण; रिक्षा चालक आरोपी ताब्यात, पाच जण फरार

Warning Pune: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा! शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणं फुल्ल; नदीपात्रात होणार विसर्ग

Pune Crime : वनराज आंदेकर खून प्रकरण; प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या समोर होणार आरोपींची ओळख परेड

SCROLL FOR NEXT