up  esakal
देश

भरतीचं स्वप्न अधुरचं; मी सर्वांना वाचवणार म्हणणाऱ्या पुजावरच काळाचा घाला

लाडक्या लेकीचं सैन्यदलात भरती होण्याचं स्वप्न अपूर्णचं; वडिलांना अश्रु अनावर

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशातील कुशीनगर (Kushinagar, Uttar Pradesh) येथे बुधवारी रात्री (Marriage Ceremony) हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात 9 मुलींसह 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेची हळहळ व्यक्त होतं आहे. हळदीच्या कार्यक्रमावेळी सर्व महिला विहिरीच्या (Well) जाळीवर बसून पूजा करत असताना जाळी तुटूल्याने महिला विहिरीत पडल्या, या घटनेनंतर काही काळ या परिसरात खळबळ आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. या घटनेत मृत पावलेल्या मुलींच वय 5 ते 15 वर्ष आहे.

दरम्यान, घटनास्थळी असलेल्या स्थानिक लोकांनी मदत कार्य केली यामुळे काही महिलांना बाहेर काढण्यात यश आलं. या दुर्घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाची मुलगी पूजा यादव (Pooja Yadav) हिने जीवाची बाजी लावून 5 जणांचा जीव वाचवला आहे. मात्र काळाने या जीव वाचवणाऱ्या रणरागीणीवरच घाला घातल्याने अनेकांचे डोळे पाणावले आहेत.

कुशीनगरच्या नेबुओ नौरंगिया येथील स्कूल टोला येथे ही घटना घडली. याठिकाणी एका घरात लग्न होतं, लग्नाच्या निमित्तानं हळदीच्या कार्यक्रमाला महिला आणि मुली लग्न मंडपाजवळी विहिरीकडे गेल्या. यातील काही महिला या विहिरीच्या स्लॅबवर उभ्या होत्या. मात्र, उभ्या असणाऱ्या महिलांची संख्या मोठी असल्यानं जास्त वजनामुळे स्लॅब खाली कोसळला. परिणामी विहिरीवर बसलेल्या सर्व महिला विहिरीत पडल्या. या दुर्घटनेत 13 जणांना जीव गमवावा लागला. यात 21 वर्षीय पूजा यादवचाही समावेश आहे. मात्र या घटनेदरम्यान पूजाने दाखवलेल्या धाडसाचं कौतूक होत आहे. पुजाने 5 जणांचा जीव वाचवला होता, यात 2 लहान मुलांचाही समावेश होता. सैन्यदलात भरती होण्यासाठी तयारी करत असणाऱ्या पूजावर मात्र काळाने घाला घातला आहे. सैन्यात भरती होण्याचं तिच स्वप्न अधुर राहिल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

पूजाचे वडिल बलवंत हे सैन्यदलात कार्यरत आहेत. मुलीच्या लग्नासाठी तेही चिंताग्रस्त होते. पुजा सैन्य दलात भरती झाली नसल्यानं तिच लग्नही थांबलं होतं. आता मात्र दुर्दैवाने लाडक्या लेकीला शेवटचा निरोप देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या धाडसी पुजासाठी संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. पूजासोबत तिची आईही विहिरीत बुडत होती. पुजाने एकापाठोपाठ एक असं करत, 5 जणांचा जीव वाचवला. सहाव्या महिलेला वाचवताना पूजा स्वत: पाण्यात बुडाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.

मी सर्वांनाच वाचवणार अशी मनाची तयारी पुजाने केली होती. त्यासाठी ती विहिरीत उतरली होती. पुजाचा हा धाडसी बाणा पाहून रडणारे, धावा करणारे पीडित मदतीसाठी पुजाचेच नाव घेत होते. दरम्यान, पूजा ही तहसीलदार शाही महाविद्यालय सिन्हा येथे बीएच्या द्वितीय वर्षात शिकत होती. त्यासोबतच तिचे दोन जुळे भाऊ आदित्य आणि उत्कर्ष हे होते. या दोन्ही भावांनी या दुर्घटनेत आपला जीव गमावला. हे दोघे भाऊ इयत्ता 9 वीत शिकत होते. पुजाचे वडिल सध्या दिल्लीत पोस्टींगवर आहेत.

या घटनेची स्थानिकांनी तात्काळ इतरांची वाट न पाहता मदत कार्य सुरू केले. परंतु महिलांची संख्या अधिक असल्याने काही स्थानिकांची तारांबळ उडाली. यात काही महिलांना बाहेर काढण्यात यश आले. परंतु 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण गाव हादरला असून सगळीकडे शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनानं मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT