Terror Attack In Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पाच जवानांपैकी एक लान्स नाईक कुलवंत सिंग आपल्या वडिलांप्रमाणेच शहीद झाले. 1999 मध्ये कारगिल युद्धात कुलवंत सिंग (Kulwant Singh) यांच्या वडिलांनी देशासाठी बलिदान दिले होते.
वडिलांनी कारगिलच्या युद्धादरम्यान सर्वोच्च बलिदान दिल्यानंतर 11 वर्षांनी 2010 मध्ये कुलवंत सिंग सैन्यात दाखल झाले होते. लान्स नाईक कुलवंत सिंग यांच्या आईने सांगितले की, जेव्हा माझा मुलगा सैन्यात भरती होण्यासाठी घर सोडत होता तेव्हा त्याने मला सांगितले की, त्याला काहीही होणार नाही आणि सर्व काही ठीक होईल. कुलवंतच्या आईने 24 वर्षांपूर्वी कारगिल युद्धात पती बलदेव सिंह यांना गमावले होतं.
बायकोशी फोनवर शेवटचं बोलणं काय झालं
कुलवंत यांची पत्नी हरदीप कौर यांनी सांगितले की, कुलवंत सिंग यांनी शहीद होण्याच्या एक दिवस आधी त्यांना फोन केला आणि आपल्या मुलाचे वेळेवर लसीकरण करण्यास सांगितले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दीड वर्षाची मुलगी, चार महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. आपले घर खूप जुने झाल्याने कुलवंत गावातील घर पुन्हा बांधण्याचा विचार करत होते.
कुलवंत सिंग हा एकमेव कमावणारा होता
कुलवंत यांना दीड वर्षाची मुलगी आणि तीन महिन्यांचा मुलगा असून ते मोगा येथील चाडिक गावात राहतात. गावातील सरपंच म्हणाले की, कुलवंत हा कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासनाने पुढे यावे.
गुरुवारी (20 एप्रिल), अज्ञात दहशतवाद्यांनी राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पूंछ दरम्यान जाणाऱ्या लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले. लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, लष्कराच्या संशयित दहशतवाद्यांनी ग्रेनेडच्या मदतीने लष्कराच्या ट्रकला आग लावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.