delhi police namaz esakal
देश

Namaz on Road: पोलीस अधिकाऱ्याची मॉब लिंचिंग झाली असती; दिल्लीतील घटनेचा नवा व्हिडिओ आला समोर

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- इंद्रलोकमध्ये रस्त्यावर नमाज पढणाऱ्या मुस्लीम व्यक्तींना एक पोलीस अधिकारी लाथा मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणावरुन अद्याप वातावरण तापलेलं आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. याच संदर्भातील एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. (possibility of mob lynching of the police officer new video of the incident in Delhi has surfaced)

इंद्रलोक मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या मशिदीमध्ये जागा कमी पडत असल्याने काही लोकांनी रस्त्यावर येऊन नमाज पठण सुरु केले होते. यावेळी वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. तक्रार मिळाल्यानंतर इंद्रलोक स्टेशनचे प्रमुख एसआय मनोज कुमार हे आपल्या टीमसोबत घटनास्थळी पोहोचले होते.

पोलीस अधिकारी नमाज पढणाऱ्या लोकांना लाथा मारत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत होतं. या घटनेच्या संपूर्ण व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये रस्त्यावरील लोकांना हटवण्याचा पोलीस अधिकारी प्रयत्न करत असल्याचं दिसतंय, पण, लोक नमाज पठण करतच राहतात. त्यानंतर अधिकारी लोकांना लाथ मारायला सुरुवात करतो. यावेळी काही लोक जमा होऊन त्याला जाब विचारायला सुरुवात करतात.

पोलीस अधिकाऱ्याची मॉब लिंचिंग झाली असती

व्हिडिओमध्ये दिसतंय की, पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली जाते. तसेच जमलेले लोक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जातात. एकजण हेलमेट घेऊन पोलिसाच्या अंगावर धावून गेल्याचं दिसत आहे. मॉब लिचिंगसारखी परिस्थिती निर्माण झालेली व्हिडिओमध्ये दिसते. पण, पोलीस अधिकारी तेथून कसेतरी जीव वाचवून निघून जातो.

पोलीस अधिकाऱ्याने नमाज पढणाऱ्या लोकांना चुकीच्या पद्धतीने उठवण्याचा प्रयत्न केल्याने जमाव आक्रमक झाला होता. जमावाने काही तास मुख्य रस्ता रोखून धरला होता. पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केल्यानंतर जमाव शांत झाला. यापूर्वी मोठ्या संख्येने लोकांनी इंद्रलोक पोलीस स्टेशनला घेरलं होतं. यावेळी काहींनी वाहनांवर दगडफेक केल्याची माहिती आहे.

दरम्यान, दिल्लीतील या घटनेवरुन वातावरण तापलं आहे. पोलिसाच्या कृतीचा निषेध व्यक्त केला जात आहे. एमआयएम प्रमुख अससुद्दीन ओवैसी यांनी यावरुन सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दुसरीकडे, पोलीस अधिकाऱ्याने ज्या पद्धतीने त्यांना उठवलं ते चुकीचं होतं. पण, रस्त्यावर नमाज पठण करणे देखील चुकीचं आहे, असं काहीचं म्हणणं आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT