नवी दिल्ली: केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येऊन नरेंद्र मोदी सरकारला (modi govt) दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. कोविड काळातील (covid time) हाताळणी आणि आर्थिक आघाडीवर (financial front) मोदी सरकारच्या कारभाराबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. दुसऱ्या टर्मला (second term) दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाची चर्चा सुरु आहे. मागच्या काही आठवड्यांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्यााची शक्यता वर्तवली जात आहे. (Possible expansion of Modi cabinet in next three days narayan rane pritam munde could be induct into cabinet)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याबरोबर मॅरेथॉन बैठकांचे सत्र सुरु आहे. मंत्रिमंडळातील आपले सहकारी नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांच्याबरोबर सुद्धा मोदींनी चर्चा केली आहे. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकेल.
दोन वर्षानंतर हा बदल होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चांगली कामगिरी नसलेल्या मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो. अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तार आणि फेरबदलाबाबत मॅरेथॉन बैठक मोदी, अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्यात सुरु आहेत. संभाव्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे आणि प्रीतम मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
पुढच्यावर्षी काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यात उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक भाजपासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण दिल्लीतल्या सत्तेचा मार्ग सर्वाधिक खासदार असलेल्या उत्तर प्रदेशातून जातो. उत्तर प्रदेशातून ८० खासदार येतात. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये सत्ता कायम राखण्याचाच भाजपाचा प्रयत्न असेल. हीच सर्व समीकरण लक्षात घेऊन मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.