उदयपूर : राजस्थानच्या उदयपूरमध्ये नूपुर शर्माच्या पाठिंब्यामुळे हत्या करण्यात आलेल्या कन्हैयालालच्या (Kanhaiya Lal) मृतदेहाचे सरकारी एमबी हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. शवविच्छेदन अहवालातून (Post Mortem report) हल्लेखोरांची क्रूरता समोर आली आहे. (Post Mortem report came after Kanhaiya Lal murder)
शवविच्छेदन अहवालानुसार, नराधमांनी कन्हैयालालवर (Kanhaiya Lal) धारदार शस्त्रांनी २६ वार केले होते. त्याच्या शरीरावर १३ खोल जखमा आढळल्या. यापैकी बहुतांश गळ्याभोवती होत्या. मान शरीरापासून वेगळी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे शवविच्छेदन अहवालानंतर (Post Mortem report) सांगण्यात येत आहे.
कन्हैयालालचा (Kanhaiya Lal) मृतदेह घरी पोहोचताच लोकांनी ‘कन्हैया अमर रहे, मारेकऱ्यांना फाशी द्या’ अशा घोषणा दिल्या. नातेवाईकांनीही ‘खून का बदल खून’ अशी मागणी केली. ज्याप्रमाणे माझ्या भावाला मारले त्याचप्रकारे दोषींना मारले पाहिजे, अशी रडत रडत कन्हैयालालची बहीण म्हणाली. जमावाने पोलिसांविरोधातही घोषणाबाजी केली.
नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकून दुखावल्यानंतर कट्टरवाद्यांनी कन्हैयालाल यांना धमकावून हत्येची घोषणा केली होती. मोहम्मद रियाझ आणि गौस मोहम्मद नावाच्या व्यक्तींनी मंगळवारी सायंकाळी कन्हैयालालची निर्घृण हत्या केली. हल्लेखोरांनी ही घटना कॅमेऱ्यात कैदही केली. दोन्ही आरोपींना राजसमंद येथे अटक करण्यात आली.
नूपुर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याप्रकरणी धनमंडी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात कन्हैयालालचाही समावेश होता. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिघांनाही अटक केली होती. नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. हे तिघेही कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर होते आणि कन्हैयालाल त्याचा बळी (Murder) ठरल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.