Power Cuts Bengaluru: टेकसिटी बंगळुरूमध्ये पुढील तीन दिवस दिवसभर बत्तीगुल होणार आहे. BESCOM आणि KPTCL कडून देखभाल आणि इतर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये तीन दिवस वीज कपात केली जाणार आहे. दोन्ही वीज कंपन्यांनी बंगळुरूच्या लोकांना वीज कपातीसाची पूर्वसुचना दिली आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्याचे सांगितले आहे.
बंगलो इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी (BESCOM) आणि कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड (KPTCL) वीज कपातीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विविध भागातील दुरुस्तीच्या कामांसह जुनी रखडलेली कामे तीन दिवस पूर्ण करायची आहेत. पायाभूत सुविधांचे नूतनीकरण आणि प्रगती करण्याबरोबरच अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांची देखभालही करावी लागते. याशिवाय अनेक भागात ओव्हरहेड केबल्स भूमिगत करण्याचे कामही करायचे असल्याचे कंपनीने म्हटले आहे. (bangalore News in Marathi)
BESCOM आणि KPTCL ने सांगितले की, विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मंगळवार, 23 जानेवारी ते गुरुवार, 25 जानेवारी या कालावधीत विविध भागात वीज कपात करण्यात आली आहे. बहुतांश भागात ही कपात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असते, मात्र त्या भागातील काम पूर्ण झाल्यानंतर पुरवठा पूर्ववतही करण्यात येणार आहे.
या भागात होणार बत्तीगुल
मंगळवार, 23 जानेवारी-
मंगळवार 23 जानेवारी रोजी खालील भागात वीज खंडित होईल. यामध्ये मायासंद्र, जडेया, शेट्टीगौडनहल्ली, सिग्गेहल्ली, एट्टीगल्ली, विजयपुरा, जगमकोटे, दोड्डाबेलावंगला, गुंडामागेरे, सासलू, ईएचटी एअर, मंजुनाथनगर, शिवानगर, प्रकाश नगर, इन पुरा, सुब्रमण्यनगर, राजाजीनगर, दुसरा बीलॉक, अमरजीनगर, 6वी बीब्लॉक, राजननगर, आपीसी लेआउट, हम्पी नगर, अग्रहारा, दसराहली, इंदिरा नगर, 12वा ब्लॉक, 7वा ब्लॉक, अकरावा ब्लॉक, आरएजी इन्फ्रास्ट्रक्चर 1 आणि 2, नऊवा ए ब्लॉक, नऊवा बी ब्लॉक, इंटेल आणि स्टेशन ऑक्झिलरी.
बुधवार, 24 जानेवारी -
मालेबेन्नूर, हलिवना, कुंबलुरु, बुद्धीहाल, नंदितावरे, कोक्कनुरू, गोविनाहल, कुन्नेबेलकेरे, हिंदूसगट्टा, कुमारहहल्ली, गुड्डादहल्ली, देवराबेलकेरे, मेलेकट्टे, जरिकट्टी, मुद्दहद्दी, सालकट्टी, बेविनाहल्ली, कडालेगुंडी, बुढीहल्ली, चथरा, मरळवाडी, गोदूर आणि आजूबाजूची गावे, बीडब्ल्यूएसएसबी एसटीपी, जक्कसांद्रा, एचएसआर पाचवा सेक्टर, शिक्षक कॉलनी, वेंकटपुराचा भाग, ग्रीनेज अपार्टमेंट आणि कोरमंगला. (Latest Marathi News)
23 जानेवारी ते 25 -
डोड्डाबल्लापुरा टाउन, राजगट्टा, टिप्पुरु, रघुनाथपुरा, तलागावरा, गंडराजपुरा, कोंगट्टा, मुद्दनायकनपल्य, हनाबे, एसएस व्हॅली, अंतरहल्ली, कांतनकुंटे, नेरलगट्टा, हडोनाहल्ली, आणि आसपासचा परिसर, ओबालापुरा, पनडलबल्ले, गेंडाहल्ली, गेंडहाळ्ली, गेंडहाल्ली सारघट्टा, महिमापुरा , लक्केनाहल्ली, मेलेकाथिगनूर, जी जी पल्या, के अग्रहारा, अरेबोम्मनहल्ली, कोडगी बोम्मनहल्ली, लक्कासंद्र, सुलकुंटे, हलकुरू आणि थिम्मासंद्र.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.