Polycystic Ovary Syndrome|Prachi Nigam Esakal
देश

Prachi Nigam: चेहऱ्यावरील केसांपेक्षा मार्क्स महत्त्वाचे, मिशीमुळे बॉडी शेम करणाऱ्यांना परखड उत्तर देणाऱ्या 'त्या' तिघी

Polycystic Ovary Syndrome: मात्र या सर्वात अशाही काही तरुणी आहेत, ज्या आपल्या चेहऱ्यावरील केस अभिमानाने मिरवतात. त्या आपल्या चेहऱ्यावरील केस हे नैसर्गिक सौंदर्य असल्याचे अभिमानाने समाजाला सांगतात.

आशुतोष मसगौंडे

नुकतेच उत्तर प्रदेशात दहावीच्या परिक्षेचा निकाल लागला यामध्ये प्राची निगम नावाची विद्यार्थिनी 98.5 टक्के मार्क मिळवत राज्यात प्रथम आली. मात्र, या सर्वात संतापजनक बाब अशी आहे की, प्राचीला मिळालेले चांगले गुण, तिचा अभ्यास आणि मेहनत पाहून तिचे कौतुक करण्याऐवजी लोक तिच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या केसांची खिल्ली उडवत आहेत.

दरम्यान या सर्वांमध्ये युपी बोर्ड परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या प्राचीने ट्रोलर्सना अजिबात किंमत दिली नाही. प्राची म्हणाली, ट्रोलर्स त्यांना हवे आहे तसे वागू शकतात. मी सध्या आनंदी आहे की, माझ्या यशामुळे मला ओळख मिळाली आहे.

पुढे प्राचीने सांगितले की, माझे कुटुंब, शिक्षक आणि मित्र-मेत्रिणींनी कधीही मला माझ्या चेहऱ्यावरील किंवा मी कशी दिसते याबद्दल काही बोलले नाहीत. त्यामुळे मला माझ्या चेहऱ्यावरील केसांपेक्षा मार्क्स महत्त्वाचे आहेत.

चेहऱ्यावरील केस अभिमानाने मिरवणाऱ्या महिला

दरम्यान प्राचीला होणारा हा त्रास काही नवीन नाही. याआधीही चेहऱ्यावर केस असलेलेल्या काही महिला व मुलींना असा त्रास सहन करावा लागला आहे.

मात्र या सर्वात अशाही काही तरुणी आहेत, ज्या आपल्या चेहऱ्यावरील केस अभिमानाने मिरवतात. त्या आपल्या चेहऱ्यावरील केस हे नैसर्गिक सौंदर्य असल्याचे अभिमानाने समाजाला सांगतात.

केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील शायजा हीच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांपासून केस आहे. आणि शायजाला यामध्ये काहीही वावगे वाटत नाही. उलटे तिला हे सर्व आवडते. शायजाला तिला तिच्या ओठावरील केस कापण्याची कधीच गरज वाटली नाही. पण हळूहळू ओठावरील केस दाठ व्हायला लागले. त्यानंतर अनेकांनी ते काढण्याचा सल्ला दिल्याचे शायजा सांगते. पण तिने यास नकार दिला.

दरम्यान, 35 वर्षांची शायजाला तिच्या ओठावरील केस अतिषय आवडतात. शायचा कित्येकवेळा तिच्या व्हाट्सअपवर तिच्या फोटोसह "I love my moustache" स्टेटस ठेवते.

Shyja

थोडसं वेगळं असलं तरी अलिकडच्या वर्षांत, अनेक स्त्रिया त्यांच्या चेहऱ्यावरच्या केसांचा स्वीकार करून ते अभिमानाने मिरवत आहेत.

दरम्यान बर्कशायर, ब्रिटन येथे राहते असलेली आणि व्यवसायाने मॉडेल असलेली 24 वर्षांची हरनाम कौर पूर्ण दाढी ठेवणारी सर्वात तरुण महिला होण्याचा पराक्रम तिने केला आहे. दाढी असलेली सर्वात लहान मुलगी म्हणून तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

हरनाम कौरला वयाच्या 11 व्या वर्षी पॉलीसिस्टिक सिंड्रोमचे निदान झाले होते. त्यामुळे तिच्यामध्ये हार्मोनल बदल होत आहेत आणि पुरुषांप्रमाणे तिच्या शरीरावर केसही वाढू लागले आहेत.

खुद्द हरनाम म्हणते की, सुरुवातीला काही अडचणी आल्या. जिकडे जायचे तिकडे लोक माझ्याकडे बघायचे. अनेकांनी तिला केस काढून टाकण्याचा सल्ला दिला, पण हरनामने हिंमत हारली याच्याशी दोन हात करत तिने चेहऱ्यावरील केस स्वीकारण्याचे ठरवले.

Harnaam Kaur

महिलांच्या चेहऱ्यावर का वाढतात केस?

स्त्रियांमध्ये चेहऱ्यावरील केसांच्या वाढीची स्थिती बहुतेक अनुवांशिक असते. म्हणजेच कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या चेहऱ्यावर जास्त केस असतील तर त्याचा परिणाम स्त्रीवरही होऊ शकतो.

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम: सामान्यतः PCOS म्हणतात. या आजारात स्त्रीच्या संप्रेरकांचे संतुलन बिघडल्याने अंडाशयात सूज येते. या काळात महिलांच्या चेहऱ्यावर केस येण्यास सुरुवात होते. पीसीओएसमध्ये अनियमित मासिक पाळी येणे, वजन वाढणे आणि केस गळणे यासारख्या समस्याही उद्भवतात.

पुरुष लैंगिक संप्रेरक वाढणे: कधीकधी पुरुष सेक्स हार्मोन ‘टेस्टोस्टेरॉन’ महिलांच्या शरीरात वाढू लागतो. त्यामुळे चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर केस अधिक वाढू लागतात. या हार्मोनच्या वाढीमुळे महिलांचा आवाजही जड होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT