Jan Arogya Yojana esakal
देश

Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजना सर्वसामान्यांसाठी ठरतेय वरदान, असा घ्यावा लाभ

योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयांत आरोग्य मित्र असतात. आरोग्यमित्र रुग्णांची ऑनलाइन नोंदणी करतात.

सकाळ ऑनलाईन टीम

Jan Arogya Yojana : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१२ मध्ये राज्यात ८ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. ही योजना प्रभावी ठरत असल्याने २०१३ मध्ये राज्यभर विस्तार केला. २०१८ मध्ये ‘महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना’ असे नामकरण केले.

सुरुवातीला विविध आजारांवरील ९२७ प्रक्रियांचा समावेश होता. जुलै २०२३ मध्ये नव्याने विविध ३२८ उपचारांचा समावेश केला. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील १४७ आजारांची संख्या वाढविली. यामुळे या योजनेत उपचार प्रक्रियांची संख्या १३५६ झाली. योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयांत आरोग्य मित्र असतात. आरोग्यमित्र रुग्णांची ऑनलाइन नोंदणी करतात. या योजनेसाठी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणाऱ्या दस्तावेजांची यादी www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

योजनेचा लाभ कुणाला?

राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंब

अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना लागू

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका कुटुंबही लाभार्थी

शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी

शासकीय महिला आश्रमातील महिला

शासकीय अनाथालयातील मुले

शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक

माहिती, जनसंपर्क कार्यालयाकडील निकषांनुसार पात्र पत्रकार व कुटुंब.

कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम

ओळखपत्र म्हणून कोणता पुरावा लागतो?

जन आरोग्य योजनेंतर्गत आरोग्य ओळखपत्र

असंघटित कामगार ओळखपत्र

शिधापत्रिका

आधार कार्ड

निवडणूक ओळख पत्र

वाहन चालक परवाना

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका, सातबारा उतारा

शहरातील रुग्णालये

मेडिकल

मेयो

डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालय

राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल

मोगरे बाल रुग्णालय

एससीजी-नार्ची कॅन्सर सेंटर

श्री राधाकृष्ण हॉस्पिटल

साक्षी नेत्रालय

रॅडिएस हॉस्पिटल

लता मंगेशकर हॉस्पिटल

मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

होप हॉस्पिटल

मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस

महात्मे आय बॅंक ॲण्ड हॉस्पिटल

आयकॉन हॉस्पिटल

गिल्लुरकर हॉस्पिटल

बारस्कर हॉस्पिटल ॲण्ड

रिसर्च सेंटर

सूरज आय इन्स्टिट्यूट

सेंट्रल ऐव्हेनयू

क्रिटिकल केअर

एलेक्झिअर मेट्रो सीटी हॉस्पिटल (central government)

ग्रामीण भागातील रुग्णालये

एम्स

नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल

शुअरटेक हॉस्पिटल

माया हॉस्पिटल बुटीबोरी

आशा हॉस्पिटल, कामठी

प्रभा हॉस्पिटल, कामठी

भगत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सावनेर

लाइफलाइन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कामठी

माहुरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कामठी

श्री भवानी मल्टीस्पेशाटिल हॉस्पिटल

शालिनीताई मेघे हॉस्पिटल रिसर्च सेंटर

किमया हॉस्पिटल रामटेक

एसडीएच १०० कामठी

एसडीस ५० रामटेक

आर एच हॉस्पिटल, उमरेड

श्रेयस पाटील हॉस्पिटल सावनेर

स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन, हिंगणा

लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा (Scheme)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT