Prajwal Revanna case -जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रमुख आणि देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षाला धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवण्णा प्रकरणी थेट भाष्य केलं आहे.
पंतप्रधान मोदी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. प्रज्वलसारख्या लोकांसाठी आमच्याकडे झिरो टोलरेंस धोरण आहे. कर्नाटक सरकारने प्रज्वलला देश सोडण्याची परवानगी दिली. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. गुजरातमध्ये ही घटना घडली असती तर त्याला गुजरात सरकार जबाबदार असते, या प्रकरणी कठोर पावले उचलण्याची जबाबदारी कर्नाटक सरकारची होती, असं मोदी म्हणाले.
अशा प्रकारे अत्याचार करणाऱ्यांना सोडता कामा नये, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. महिलांचे 2 -3 हजार व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ते आताचे नसावेत. हे व्हिडिओ त्यावेळचे आहेत जेव्हा राज्यात जेडीएस आणि काँग्रेस एकत्र होते. मग हे व्हिडिओ आताच का समोर आले ? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस सरकारला केला आहे. (PM Modi statement on Prajwal Revanna)
प्रज्वल रेवण्णा हे हसन लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. जेडीएस आणि भाजपने राज्यात युती केली आहे. युतीकडून त्यांना हसन लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं होतं. याच दरम्यान रेवण्णा यांच्या प्रकरणी काही व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे रेवण्णा हे अडचणीत सापडले आहेत. रेवण्णा देश सोडून पळून गेले असून ते जर्मनीमध्ये असल्याचं कळतंय.
कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. शिवाय हे व्हिडिओ हजारोंच्या संख्येने आहेत. प्रज्वल रेवण्णा यांच्या चालकानेच हे व्हिडिओ बाहेर काढल्याचं सांगितलं जातं. प्रज्वल यांच्या वडिलांना पोलिसांकडून अटक झाली आहे. प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात देखील ब्लू कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे. भारतात पाऊल ठेवल्या-ठेवल्या त्यांना अटक करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.