Prashant Kishor
Prashant Kishor sakal
देश

Prashant Kishor : प्रशांत किशोर यांना बिहारच्या नेतृत्वाचे स्वप्न; राजकीय पक्षाची करणार स्थापना

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

पाटणा - विविध राजकीय पक्षांना निवडणुकीसंबंधी सेवा देणारे राजकीय विश्‍लेषक प्रशांत किशोर आता बिहारचे नेतृत्व करण्यासाठी तयारी करत आहेत. पक्षीय राजकारणात उतरून बिहारमधील गरिबी दूर करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

रोजगारासाठी बिहारी जनतेचे अन्य राज्यांत होणारे स्थलांतर थांबविण्याचे आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचे ध्येय किशोर यांनी समोर ठेवले असून त्यासाठी दोन ऑक्टोबरला ते ‘जनसुराज’ या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.

प्रशांत किशोर यांनी गेल्या वर्षी ‘जनसुराज’ मोहीम केली होती. पायी यात्रा करताना त्यांनी ‘जेडीयू’, भाजप आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षांविरोधात मतप्रवाह तयार करण्याचा प्रयत्न केला होता. बिहारच्या भविष्यासाठी या पक्षांकडे योजना नाही, ते बिहारला जातीयवादातच अडकवून ठेवत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

संघटनेचे पक्षात रूपांतर

पदयात्रेनंतर प्रशांत किशोर यांनी आता ‘जनसुराज’चे रूपांतर राजकीय पक्षात करण्याची घोषणा केली आहे. पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर पक्षाशी जोडणाऱ्या लोकांचा एक समूह तयार केला आहे. पुढील एका वर्षात पक्ष सक्रिय राजकारणात उतरणार असल्याचे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशावर प्रकाश आंबेडकरांनी बोलणं टाळलं! म्हणाले, 'आयाराम गयारामचं जे राजकारण...'

IND vs ZIM T20 Series : बोर्डाने केली मोठी घोषणा! टी-20 मालिकेच्या 1 दिवसआधी संघांला मिळाला नवीन कोच

Congress: भाव वाढला! लोकसभेत 99 जागा जिंकलेल्या काँग्रेसमध्ये 6 आमदारांचा प्रवेश

RBI Action: आरबीआयने आणखी एका बँकेला ठोकलं टाळं; पैसे काढता येणार की नाही? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Live News Updates : उद्योगाबाबत श्वेतपत्रिका काढली जाईल- अजित पवार

SCROLL FOR NEXT