Prashant Kishor Plan for Congress E sakal
देश

काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी काय आहे प्रशांत किशोर यांचा प्लॅन?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) लवकरच काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करण्याची शक्यता आहे. किशोर यांनी गांधी कुटुंबीयांसोबत झालेल्या बैठकीत नवीन काँग्रेसची उभारणी आणि विधानसभांसह आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) जिंकण्यासाठी रणनिती मांडली. यावेळी प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या काही निवडक नेत्यांसमोर सादरीकरण केले.

काँग्रेसला २०२४ च्या निवडणुका कशा जिंकता येतील? याबाबत प्रशांत किशोर यांनी रणनिती सांगितली आहे. तसेच १९८४ ते २०१९ या कालावधीत काँग्रेसच्या पडझडीमागील कारण देखील सांगण्यात आले आहे. तसेच काँग्रेसला लाभलेल्या वारसाचे भांडवल करण्यात अपयश, संघटनात्मक बांधणी, लोकांपर्यंत पोहण्यात अपयशी ठरल्यामुळे काँग्रेसची ही अवस्था झाल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे. प्रशांत किशोर यांच्या योजनेनुसार, काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी पक्षाची पुनर्बांधणी आणि लोकशाहीकरण करणे गरजेचे आहे. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.

प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस २.० नुसार, सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्ष, तसेच गांधी कुटुंबाशिवाय कार्याध्यक्ष किंवा उपाध्यक्ष आणि राहुल गांधींना संसदीय मंडळाचे प्रमुख बनवावे, असं सुचविण्यात आलं आहे. काँग्रेस नेतृत्वाच्या निर्देशानुसार तळागाळात पोहोचून काम करणारे बिगर गांधी कार्याध्यक्ष पाहिजे, असं या अहवालात म्हटलं आहे. तसेच पक्षातील अंतर्गत वाद सोडवणे, तळागाळातील नेत्यांची पुनर्बांधणी करणे, माध्यमे आणि डिजिटल प्रचाराचे समर्थन करणे या सर्व गोष्टी प्रशांत किशोर यांनी सूचविल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharshtra Politics: ...तर १००० कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील, मुख्यमंत्रीपदावरून BJPच्या बड्या नेत्याचं खळबळजनक ट्विट

WTC Points Table: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाकडून हिसकावला 'नंबर वन'चा मुकूट; पर्थमधील विजयानंतर कसे आहे फायनलचे समीकरण?

Maharashtra Cabinet: नव्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी लॉबिंगला सुरुवात; कोणते आमदार गेलेत नेत्यांच्या भेटीला? जाणून घ्या

Madhuri Misal : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार माधुरी मिसाळ यांचे मेट्रोमार्ग, रुग्‍णालयाच्‍या कामांना प्राधान्‍य

Share Market Closing: शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद; सेन्सेक्स 1000 अंकांच्यावर, निफ्टीने पार केला 24,200चा टप्पा

SCROLL FOR NEXT