Prashant Kishor predicts how many seats BJP will win in Lok Sabha election 2024 marathi Political News  
देश

Prashant Kishor: लोकसभा निवडणुकीत भाजप विजयी होणार? मोदींच्या हॅट्रिकबद्दल प्रशांत किशोर यांची मोठं भाकित

Prashant Kishor on Lok Sabha Election 2024 Result : देशात लोकसभा निवणुकीच्या पाच टप्प्यांचे मतदान पार पडले आहे, यानंतर निवडणुकीत कोण विजयी होणार याबद्दल अंदाज व्यक्त केले जात आहेत.

रोहित कणसे

Prashant Kishor on Lok Sabha Election 2024 Result : देशात लोकसभा निवणुकीच्या पाच टप्प्यांचे मतदान पार पडले आहे, यानंतर निवडणुकीत कोण विजयी होणार याबद्दल अंदाज व्यक्त केले जात आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतेच मोठा दावा केला आहे की सध्या केंद्रात असलेल्या मोदी सरकारविरोधात विशेष असंतोष पाहायला मिळत नाहीये, यासोबतच भक्कम पर्याय देखील दिसून येत नाहीये.

यासोबतच प्रशांत किशोर म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापण करेल. त्यांनी सांगितलं की, भाजप यावेळी देखील २०१९ इतक्या ३०३ जागांच्या जवळपास किंवा त्याहून अधिक जागा जिंकू शकते.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले की, मला वाटतं की मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सत्तेत परत येताना दिसत आहे. त्यांना मागच्या वेळी मिळाल्या तेवढ्या किंवा त्याहून काहीश जास्त जागा मिळू शकतात, भाजपच्या ३७० जागांच्या टार्गेटबद्दल विचारले असता प्रशांत किशोर म्हणाले की, जर भाजपने २७५ जागा जिंकल्या, तर त्यांचे नेते आम्ही सरकार बनवणार नाही, कारण आम्ही ३७० जागा जिंकण्याचा दावा केला होता असे म्हणणार नाहीत.

आपल्याला हे पाहावे लागेल की भाजप बहुमताचा आकडा पार करत आहे की नाही. पण मला वाटत नाही की भाजपला सत्तेत परत येण्यासाठी कोणताही धोका आहे, असेही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं.

इतकंच नाही तर प्रशांत किशोर यांनी भाजपचा ३७० जागा जिंकण्याचा दावा स्मार्ट मूव्ह असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, यामुळे निवडणुकीची चर्चा बदलली. ते पुढे बोलताना म्हणाले की, जेव्हा एखाद्या कंपनीकडून अपेक्षा खूप जास्त असतात आणि चांगली कामगिरी करूनही ती ती पूर्ण करू शकत नाहीत, तेव्हा त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येतो. त्याचप्रमाणे भाजपला ३७० पेक्षा कमी जागा मिळाल्या, तर तो चर्चेचा विषय होऊ शकतो. चर्चा आणि त्याचा परिणाम बाजारावरही दिसून येतो.

प्रशांत किशोर म्हणाले की, गेल्या ३-४ महिन्यांत ३७० आणि ४०० च्या पुढे चर्चा सुरू आहे. ही भाजपची रणनीती किंवा विरोधकांची कमकुवतपणा समजा पण भाजपने आपले लक्ष्य २७२ वरून ३७० पर्यंत हलवले आहे. याचा फायदा भाजपला झाला. आता कोणी म्हणत नाही की मोदीजी हरतील, प्रत्येकजण म्हणत आहे की त्यांना ३७० जागा मिळतील की नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT