Pravasi Bharatiya Divas 2023 esakal
देश

Pravasi Bharatiya Divas 2023 : कोव्हिड नंतर साजरा होणार प्रवासी भारतीय दिवस; जाणून घ्या महत्व!

भारतात सगळीकडे प्रवासी भारतीय दिवसाची उत्सुकता

सकाळ डिजिटल टीम

Pravasi Bharatiya Divas 2023 : भारतात सगळीकडे प्रवासी भारतीय दिवसाची उत्सुकता आहे, भारतात 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. आज म्हणजेच 8 जानेवारीपासून तर 10 जानेवारीपर्यन्त भारतात दर दोन वर्षांनी यासाठी एक भव्य संमेलन आयोजित केलं जातं. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत.

कोविड महामारीमुळे चार वर्षांनंतर देशात प्रवासी भारतीय संमेलन साजरं केलं जाणार आहे; त्यामुळे याच एक वेगळंच महत्त्वं ठरणार आहे. यावर्षी हा कार्यक्रम मध्य प्रदेशातल्या इंदोरमध्ये साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याला बघण्यासाठी जगभरातून लोकं येत असतात. देशवासीय आणि अनिवासी भारतीय दोघेही या संमेलनासाठी खूप उत्सुक असतात.

प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो?

दरवर्षी 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. या वर्षी प्रवासी भारतीय दिवसानिमित्त इंदोरमध्ये तीन दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, ते 8 जानेवारी म्हणजे आजपासून सुरू होतं आहे. 10 जानेवारीला संमेलनाचा समारोप होणार आहे.

प्रवासी भारतीय दिवस - इतिहास

प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याची घोषणा तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 2002 साली केली होती. या दिवसाला 1915 चा इतिहास आहे. दिवंगत लक्ष्मी सिंघवी यांनी सर्वात आधी प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याची संकल्पना मांडली होती.

त्यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने स्थापन केलेल्या भारतीय डायस्पोरावरील उच्च समितीच्या शिफारशींनुसार हा दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 2003 मध्ये प्रथमच प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात आला.

प्रवासी भारतीय दिवस ९ जानेवारीला का साजरा केला जातो?

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी 9 जानेवारी 1915 रोजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले आणि त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला सुरुवात केली. महात्मा गांधी यांना प्रवासी मानले जाते. जेव्हा महात्मा गांधी दक्षिण भारतातून परतले आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले, तेव्हा त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

प्रवासी भारतीय दिवसाची थीम

दर दोन वर्षांनी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो आणि याची खास थीम असते. या थीमवर हा विशेष दिवस साजरा केला जातो. प्रवासी भारतीय दिवस सुरू झाल्यापासून हा दिवस 2015 पर्यंत दरवर्षी साजरा केला जात होता.

पण, 2015 मध्ये दर दोन वर्षांतून एकदा तो साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वर्षी प्रवासी भारतीय दिवसाची थीम होती 'अपना भारत अपना गौरव'. त्यानंतर 2021 मध्ये शेवटच्या वेळी साजरा केला. कोविड 19 मुळे प्रवासी भारतीय संमेलन दोन वर्षांपासून आयोजित करण्यात आले नव्हते. प्रवासी भारतीय दिवस 2023 ची थीम 'प्रवासी: अमृत काळातील भारताच्या प्रगतीचे विश्वसनीय भागीदार' आहे.

प्रवासी भारतीय दिवसाचे महत्त्व

परदेशातील भारतीयांना देशवासीयांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

परदेशी भारतीयांना भारतीय तरुणांशी जोडणे.

गुंतवणुकीच्या संधी वाढवण्यासाठी.

परदेशातील भारतीयांना देशाच्या सरकार आणि नागरिकांशी जोडणाऱ्या फायदेशीर उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT