देश

Pravasi Bharatiya Diwas : भारतीय सर्वात शक्तिशाली! भारतीय प्रवाशांचा देशाला किती फायदा होतो?

भारतीय प्रवासी दिवस दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो.

Aishwarya Musale

भारतीय प्रवासी दिवस दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. पहिल्यांदा 2003 मध्ये साजरा करण्यात आला होता, या दिवसाला एक विशेष महत्त्व असून हा दिवस पहिल्यांदा 2003 मध्ये साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून तो दरवर्षी साजरा केला जात आहे.

जगभरातील 100 पेक्षा जास्त देशांमध्ये 3.2 कोटींहून अधिक भारतीय राहतात. गेल्या 28 वर्षांत परदेशात स्थायिक होणाऱ्या भारतीयांच्या संख्येत 346% वाढ झाली आहे. 1990 मध्ये परदेशात राहणाऱ्या भारतीयांची संख्या 90 लाख होती. बहुतांश भारतीय नागरिक अमेरिकेत स्थायिक झाले आहेत.

येथे राहणाऱ्या भारतीयांची संख्या 44 लाख 60 हजारांहून अधिक आहे. UAE मध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारतीय राहतात. येथे राहणाऱ्या भारतीयांची संख्या 34 लाख 25 हजारांहून अधिक आहे. जाणून घेऊया जगात भारतीय किती शक्तिशाली आहेत, त्यांच्यापासून देशाला किती फायदा होतो?

प्रथम जाणून घ्या NRI कोणाला म्हणतात?

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतातून इतर देशांमध्ये स्थलांतरित झालेल्या लोकांना एनआरआय म्हणतात. अनिवासी भारतीयांची सध्या तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

1. NRI (नॉन रेजिडेंट इंडियन): म्हणजे भारतीय नागरिक जे नोकरी किंवा शिक्षणासाठी सहा महिन्यांसाठी तात्पुरते दुसऱ्या देशात गेले आहेत. यापैकी काही लोक परदेशात स्थायिक होतात आणि त्या देशाचे नागरिकत्व घेतात, अशा लोकांना एनआरआय म्हणतात.

2. PIO (पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन): यामध्ये अशा लोकांचा समावेश होतो जे जन्माने किंवा वंशाने भारतीय आहेत, परंतु आता भारतात राहत नाहीत.

3. OCI (ओवरसीज सिटीजन ऑफ इंडिया): यामध्ये ते लोक समाविष्ट आहेत जे २६ जानेवारी १९५० रोजी किंवा त्यानंतर भारताचे नागरिक होते किंवा त्या तारखेला किंवा १५ ऑगस्ट रोजी भारताचे नागरिक होण्यास पात्र होते. 1947 नंतर भारताचा भाग बनलेल्या कोणत्याही क्षेत्राशी संबंधित किंवा अशा व्यक्तीचे मूल किंवा नातवंडे, जे इतर निकष पूर्ण करते. मात्र, आता दुसऱ्या देशात राहतात.

या 10 देशांमध्ये सर्वाधिक भारतीय राहतात

अमेरिका 44.60 लाख

युएई 34.25 लाख

मलेशिया 29.87 लाख

सौदी अरेबिया 25.94 लाख

म्यानमार 20.09 लाख

ब्रिटन १८.९२ लाख

कॅनडा 16.89 लाख

श्रीलंका 15.04 लाख

दक्षिण आफ्रिका 14.90 लाख

कुवेत 10.29 लाख

अनिवासी भारतीय किती शक्तिशाली आहेत?

परदेशातील भारतीयांचा जगभरात मोठा प्रभाव आहे. भारतीय वंशाचे 70 हून अधिक नेते आहेत ज्यांनी जगातील विविध देशांमध्ये सर्वोच्च पदे प्राप्त केली आहेत. भारतीय वंशाच्या नेत्यांनी मॉरिशसमध्ये सर्वाधिक नऊ वेळा राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधानपद भूषवले आहे. सर शिवसागर रामगुलाम हे त्यापैकी पहिले आहेत. शिवसागर हे १४ वर्षे मॉरिशसचे पंतप्रधान होते. त्यांचे वडील भारतीय होते. शिवसागर हे 1968 ते 1982 पर्यंत मॉरिशसचे पंतप्रधान होते.

याशिवाय अनिरुद्ध जगन्नाथ हे आधी पंतप्रधान आणि नंतर राष्ट्रपती होते. वीरासामी रिंगाडू, कसम उतीम, नवीन रामगुलाम कुशवाह, कैलाश पुरयाग, अमिना गुरीब-फकिम, प्रविंद जगन्नाथ, पृथ्वीराज सिंह रूपन हे देखील मॉरिशसचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती राहिले आहेत. याशिवाय 40 देशांतील 350 हून अधिक खासदार भारतीय वंशाचे आहेत.

अनेक कंपन्यांचे सीईओही भारतीय वंशाचे आहेत

जगभरातील 500 हून अधिक टॉप कंपन्यांमध्ये, 17% पेक्षा जास्त चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर (CEO) भारतीय वंशाचे आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, अडोबचे शंतनू नारायण, चॅनलचे लीना नायर, आयबीएमचे अरविंद कृष्णा, मायक्रॉनचे संजय मेहरोत्रा, मास्टरकार्डचे अजयपाल सिंग, अरिस्ता नेटवर्क्सचे जयश्री उल्लाल, नेटअॅपचे सीईओ जॉर्ज कुटूल. अनेक जागतिक कंपन्यांचे सीईओ भारतीय वंशाचे आहेत.

अनिवासी भारतीय देशाला कशी मदत करतात?

जगभरात राहणारे अनिवासी भारतीय त्यांच्या देशाला मदत करण्यात मागे राहत नाहीत. 2022 मध्ये, अनिवासी भारतीयांनी भारतात जास्तीत जास्त 100 अब्ज डॉलर्स पाठवले होते. अनिवासी भारतीय देशात परकीय चलन पाठवण्यात आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिको आहे. परदेशात राहणार्‍या मेक्सिकन लोकांनी देशात $60 अब्जाहून अधिक पाठवले होते. चिनी स्थलांतरितांनी 51 अब्ज डॉलर्स देशात पाठवले, फिलिपिन्सनी 38 अब्ज डॉलर्स, इजिप्शियन स्थलांतरितांनी 31 अब्ज डॉलर्स, पाकिस्तानींनी 29 अब्ज डॉलर्स, बांगलादेशींनी 21 अब्ज डॉलर्स आणि नायजेरियनांनी 21 अब्ज डॉलर्स देशात पाठवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT