Atique Ahmed News 
देश

Atique Ahmed News : उमेश पाल अपहरण प्रकरणात अतिक अहमद याला जन्मठेप

सकाळ डिजिटल टीम

Court sentences Atique Ahmed to life imprisonment : प्रयागराजच्या स्पेशल एमपी-एमएलए कोर्टाने उमेश पाल अपहरण प्रकरणात निकाल दिला आहे. १७ वर्षे जुन्या या अपहरण प्रकरणात तसेच न्यायालयाने अतिक अहमदला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून त्याला 5,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणात न्यायालयाने माफिया अतिक अहमदसह तीन आरोपींना दोषी ठरवले आहे, तर सात आरोपींना निर्दोष घोषित केले आहे.

अतिक अहमद, सौलत हनिफ आणि दिनेश पासी यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर अश्रफसह सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अहमद आणि अशरफ यांच्यावर २००५ मध्ये राजू पाल यांच्या हत्येचा मुख्य साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

हेही वाचा- जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

काय प्रकरण आहे?

बसपा आमदार राजू पाल हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याच्याशी संबंधित खटल्यात न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. या प्रकरणात २८ फेब्रुवारी २००६ रोजी अतिक अहमद आणि अशरफ यांनी उमेश पाल यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे.

उमेश पाल यांना मारहाण केल्यानंतर, कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देऊन न्यायालयात बळजबरीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. २००७ मध्ये मायावतींचे सरकार स्थापन झाल्यानंतर ५ जुलै २००७ रोजी उमेश पाल यांनी अतिक आणि अशरफ यांच्यासह पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला.

पोलिस तपासात आणखी सहा जणांची नावे समोर आली. अतिक आणि अशरफसह ११ जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी २००९ मध्ये सुरू झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार हजर करण्यात आले. या प्रकरणातील ११ आरोपींपैकी अन्सार बाबा नावाच्या आरोपीचा मृत्यू झाला आहे. अतीक आणि अशरफसह एकूण १० आरोपींविरोधात न्यायालयाने मंगळवारी आपला निकाल दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT