Prayagraj Violence esakal
देश

Prayagraj : नमाज पठणानंतर हिंसाचार; 40 जणांना अटक, 1000 हून अधिक जणांवर गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

प्रयागराजमध्ये झालेल्या दगडफेकीत पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.

प्रयागराज : कानपुरात गेल्या शुक्रवारी झालेल्या हिंसाचारानंतर (Prayagraj Violence), पहिल्यांदा जुम्म्याची नमाज पढण्यात आली. यासाठी संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, तरीही उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) तीन शहरांत नमाजानंतर तीव्र आंदोलन करण्यात आलं. प्रयागराजमध्ये हिंसाचार झाला असून नमाज झाल्यानंतर, जमावानं निदर्शने केली आणि जोरदार दगडफेक केलीय. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून पोलीस (Police) अधिकारी जखमी झाले आहेत.

प्रयागराजमध्ये झालेल्या दगडफेकीत पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. काही घरांमधून पोलिसांवर दगडफेक झाल्याची माहिती आहे. पोलिसांनीही त्या दगडफेकीला प्रत्युत्तर दिलं. पोलिसांच्या बंदोबस्तानंतरही जमाव ऐकण्यास तयार नसल्याचं दिसलं. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली असून पोलीस अधीक्षकांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे. प्रयागराज झोनचे एडीजी प्रेम प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही संघटनांनी पूर्ण तयारीनिशी ही घटना घडवलीय. प्रयागराजमधील हिंसाचारात डाव्या संघटना, पीएफआय, एआयएसए, सीएए आणि एनआरसी चळवळीला पाठिंबा देणारे लोक आहेत. सुमारे 3 तासांच्या संघर्षानंतर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलीय.

प्रयागराजमध्ये हिंसाचार निर्माण करणाऱ्यांची ओळख पटली असून 40 जणांना अटक करण्यात आलीय. तर, 1000 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलंय. एडीजीच्या म्हणण्यानुसार, सामाजिक कार्यकर्त्या सारा अहमद, एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाह आलम, डावे नेते डॉ. आशिष मित्तल, इमाम अली अहमद यांनी हा हिंसाचार घडवल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT