Predator Drone esakal
देश

Predator Drone : सगळीकडे भारताचीच हवा! आता प्रीडेटर ड्रोन हवेतच देणार शत्रूला देणार सडेतोड उत्तर,अमेरिकेसोबत झाला करार

भारत अमेरिकेकडून आणखी काय खरेदी केले?

Pooja Karande-Kadam

Predator Drone :

हवाई हल्ले करणाऱ्या दुष्मनांसाठी एक दुख:द बातमी आहे. भारतावर वाईट नजर ठेऊन हवाई हल्ले करणाऱ्यांनी आता सांभाळून रहावं. कारण, भारताची ताकद आता वाढली आहे. अमेरिकेसोबत झालेल्या करारात प्रीडेटर ड्रोन भारताला मिळणार आहेत. त्यामुळे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेत अधिकच भर पडणार आहे.

अमेरिकेने भारताला 31 MQ-9B प्रीडेटर ड्रोन देण्याच्या कराराला मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात या कराराची घोषणा करण्यात आली होती. 31 ड्रोनशिवाय इतर अनेक तंत्रज्ञान आणि शस्त्रे भारताला विकली जातील. संपूर्ण कराराची अंदाजे किंमत सुमारे 4 अब्ज डॉलर्स (सुमारे 32 हजार कोटी रुपये) आहे.

 

अमेरिकेच्या सुरक्षा एजन्सीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 'या करारामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध मजबूत होतील'. प्रस्तावित मेगा ड्रोन डील भारताच्या सीमा सुरक्षेत गेम चेंजर ठरेल. आधुनिक मॉडेल्ससह सुसज्ज हाय अल्टिट्यूड लाँग एन्ड्युरन्स ड्रोनमध्ये सर्व हवामानात उड्डाण करण्याची आणि शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची क्षमता आहे.

प्रीडेटर ड्रोन कोणत्या उद्देशांसाठी वापरले जातात?

या करारांतर्गत, भारताला दोन प्रकारचे प्रीडेटर ड्रोन मिळतील - स्काय गार्डियन आणि सी गार्डियन. सागरी सिमेवर पाळत ठेवण्यासाठी सी गार्डियन ड्रोन आणि जमिनीच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी स्काय गार्डियन ड्रोन तैनात केले जातील.

31 ड्रोनपैकी आर्मी आणि एअर फोर्सला प्रत्येकी आठ स्काय गार्डियन Version ड्रोन्स मिळतील. तर, नौदलाला MQ-9B च्या 15 सी गार्डियन Version देण्यात येतील.

अमेरिकेच्या ड्रोनची खास वैशिष्ट्ये काय आहेत?

Sky Guardian ची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की सुरक्षा दलांना कमी वेळेत परिस्थितीजन्य माहिती मिळू शकेल. ड्रोन लिंक्स मल्टी-मोड रडार आणि प्रगत इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रारेड सेन्सर्ससह येतो. आपोआप टेकऑफ आणि लँडिंग करू शकतो. विशेष म्हणजे ते 40 तासांपेक्षा जास्त वेळ सतत काम करू शकतात.

अहवालानुसार, ते 40 हजार फूट उंचीपर्यंत उडू शकतात आणि 1,850 किलोमीटरपर्यंत माहिती गोळा करू शकतात. याचा अर्थ असा की दिवस असो वा रात्र, प्रत्येक हंगामात हे प्रीडेटर ड्रोन हजारो फूट उंचीवरून शत्रूंच्या हालचालींवर तासनतास लक्ष ठेवू शकतात.

सीमेवरील सुरक्षा कशी मजबूत होणार?

अमेरिकेचे प्रीडेटर ड्रोन सध्याच्या आणि भविष्यातील धोक्यांना तोंड देण्याची भारतीय सुरक्षा दलांची क्षमता सुधारेल. या करारानंतर चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) आणि पाकिस्तानसोबतच्या नियंत्रण रेषेवर (LOC) भारताची स्थिती मजबूत होईल.

या मानवरहित हवाई वाहनांमध्ये लढाऊ विमानांसारख्या शत्रूच्या लक्ष्यांवर क्षेपणास्त्रे आणि दारुगोळा डागण्याची क्षमता आहे.

मानवरहित हवाई वाहनाच्या मदतीने सीमेपलीकडील शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारत अमेरिकेकडून खरेदी करत असलेल्या ड्रोनमध्ये हेलफायर मिसाईल आणि लेझर गाईडेड बॉम्बही बसवले जाऊ शकतात. चिनी सैन्याकडे स्वतःचे सशस्त्र ड्रोनही आहेत. तथापि, MQ-9B प्रीडेटर ड्रोनमध्ये प्रगत क्षमता आहे.  

प्रीडेटर ड्रोन युद्धनौकेवरूनही उड्डाण करू शकतो. हे 2155 किलो बाह्य पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे. सागरी सीमेवर लक्ष ठेवण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावतील. हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या वर्चस्वावर नजर ठेवण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारत अमेरिकेकडून आणखी काय खरेदी केले?

अमेरिकेच्या डिफेन्स सिक्युरिटी कॉर्पोरेशन एजन्सीने प्रेस रिलीजमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील सुमारे 4 अब्ज डॉलरच्या कराराचा तपशील दिला आहे. 31 MQ-9B प्रीडेटर ड्रोन व्यतिरिक्त, डीलमध्ये शस्त्रे आणि त्यांच्यामध्ये स्थापित तंत्रज्ञान देखील समाविष्ट आहे.

  • 161 एम्बेडेड ग्लोबल पोझिशनिंग आणि इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टम

  • 35 रिओ ग्रांडे कम्युनिकेशन्स इंटेलिजन्स सेन्सर सूट

  • 170 AGM-114R हेलफायर क्षेपणास्त्रे

  • 16 M36E9 हेलफायर कॅप्टिव्ह एअर ट्रेनिंग क्षेपणास्त्रे

  • 210 GBU-39B/B लेझर लहान व्यासाचा बॉम्ब

  • सर्विलांस सिस्टम आणि रडार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT