Prem Singh Tamang Sakal
देश

Prem Singh Tamang : ‘लोककल्याणकारी’ प्रतिमानिर्मितीचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

गंगटोक : सिक्कीममध्ये विधानसभेच्या ३२ पैकी ३१ जागांवर विजय प्राप्त करत सिक्किम क्रांतिकारी मोर्चाची सत्ता टिकविणाऱ्या प्रेमसिंह तमांग यांनी त्यांची खुर्ची टिकविण्यात यश मिळविले आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली एक वर्षांचा तुरुंगवास भोगणारे प्रेमसिंह तमांग हे लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून कुशल प्रशासक अशी प्रतिमा बनवू पाहाणाऱ्या तमांग यांचा राजकीय प्रवास

  • १९९४ सिक्किम डेमॉक्रॅटिक फ्रंटचे (एसडीएफ) सहसंस्थापक, २० वर्षे एसडीएफच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय, १५ वर्षे तमांग यांच्याकडे मंत्रिपद

  • २०१३मध्ये एसडीएफमधून बाहेर पडत सिक्किम क्रांती मोर्चाची (एसकेएम) स्थापना

  • २०१४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तमांग यांच्या ‘एसकेएम’च्या दहा उमेदवारांचा विजय

  • २०१७मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तमांग दोषी सिद्ध, शिक्षेपोटी एक वर्षांचा तुरुंगवास

  • २०१९ सिक्कीमच्या राजकारणात पुन्हा सक्रिय; विधानसभा निवडणुकीमध्ये १७ जागांवर विजय; मुख्यमंत्रिपदी विराजमान

  • सत्ता प्राप्त झाल्यानंतर लोककल्याणकारी योजनांवर विशेषतः महिला आणि गरिबकल्याण योजनांवर भर

  • मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पाच महिन्यात पोकलोक कामरांग या तमांग यांचे पूर्वीचे राजकीय गुरू आणि नंतरचे विरोधक पवनकुमार चामलिंग याच्या मतदारसंघातून विजय

  • केंद्रसरकारशी चांगले संबंध प्रस्थापित करत विकास कामांसाठी भरपूर निधी मिळविला

  • २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपशी संबंध तोडत विधानसभा स्वतंत्रपणे लढवून विजयी

चामलिंग याचे शिष्य ते विरोधक

प्रेमसिंह तमांग यांनी त्यांची राजकीय कारकीर्द एसडीएफचे संस्थापक आणि सर्वांत दीर्घकाळ मुख्यमंत्रिपदावर राहिलेल्या पवन कुमारचामलिंग यांच्या मार्गदर्शनाखाली केली. सुमारे २० वर्षे चामलिंग यांच्याकडून राजकीय डावपेचांचा अनुभव घेतल्यानंतर मतभेद झाल्यामुळे तमांग यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना करत चामलिंग यांच्याशी राजकीय शत्रुत्व पत्करले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT