मुंबई ः देशातील सुमारे चारशे विद्यापीठांनी परिक्षेस अनुकुलता दर्शवली असल्याचे वृत्त आहे. देशातील 184 विद्यापीठांनी परिक्षा घेतली आहे, तर 234 विद्यापीठांनी परिक्षा घेण्याची तयारी सुरु केली असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाकडील आकडेवारी सांगत आहे.
महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली यांनी कोरोनाची साथ वाढत असल्यामुळे परिक्षा घेण्यास असमर्थता दर्शवल्याचे पत्र विद्यापीठ अनुदान आयोगास पाठवले आहे तसेच उच्च न्यायालयातही हेच सांगितले आहे. काही आठवड्यांपूर्वी देशातील अंतिम वर्षाच्या सर्व परिक्षा रद्द करण्याची विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळालेली माहीती मोलाची आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परिक्षा बंधनकारक असल्याचे सांगितल्यावर त्याबाबतची परिस्थिती कळवण्यास सांगितले होते. देशात जवळपास एक हजार विद्यापीठ आहेत. त्यातील 640 विद्यापीठांनी प्रतिसाद दिला आहे. यापैकी 120 अभिमत विद्यापीठ आहेत, तर 229 खाजगी, विविध राज्यातील 251 आणि 40 मध्यवर्ती विद्यापीठ आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडे आलेल्या माहीतीनुसार 182 विद्यापीठात परिक्षा झाली आहे. अन्य 234 विद्यापीठांनी ऑगस्ट अथवा सप्टेंबरमध्ये परिक्षा घेण्याचा विचार असल्याचे कळवले आहे, तर 30 विद्यापीठांनी आपल्या परिषदेच्या सूचनेची प्रतिक्षा असल्याचे सांगितले असल्याचेही वृत्तात म्हंटले आहे. याचवेळी 177 विद्यापीठांनी परिक्षेबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. 2019-20 मध्ये सुरु झालेल्या 27 खाजगी विद्यापीठांपैकी 20 मध्ये अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याची वेळ आलेली नाही. देशातील विद्यापीठांचे महत्त्व कायम राखण्यासाठी परिक्षा आवश्यक आहेत असे विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हंटले आहे.
----------------------
( Edited by Tushar Sonawane )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.