नवी दिल्ली- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. ८० लष्करी कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. यातील १२ जणांना तो मरणोत्तर मिळाला आहे. ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हे पुरस्कार दिली जातील. (President Droupadi Murmu has approved Gallantry awards to 80 Armed Forces personnel eve of the 75th Republic Day)
सहा जणांना किर्ती चक्रा देण्यात आले आहे, त्यातील तिघांना तो मरणोत्तर देण्यात आला. १६ शौर्य चक्रा पुरस्कार, त्यातील दोघांना मरणोत्तर पुरस्कार मिळाला. ५३ लष्करी कर्मचाऱ्यांना सेना मेडल्स देण्यात आलेत, त्यातील सात जणांना तो मरणोत्तर मिळाला आहे. नाव सेना मेडल आणि चार वायु सेना मेडल देण्यात आले आहेत.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला देशवासियांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी राम मंदिराचा उल्लेख केला, तसेच कर्पूरी काठुर यांना देखील श्रद्धांजली वाहिली. देशवासियांना त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ७५ वा प्रजासत्ताक दिवस हा ऐतिहासिक पल्ला आहे. हे एक युगप्रवर्तक कालखंड आहे. आज आपल्या मूलभूत सिद्धांतांना आठवण करण्याचा योग्य क्षण आहे, असं त्या म्हणाल्या.
आपल्या प्रजासत्ताकाच्या मूळ भावनेशी एकजूट होऊन १४० कोटी भारतीय एका कुटुंबाप्रमाणे राहत आहेत. जगातील सर्वात मोठे हे कुटुंब असून यात सह अस्तित्वाची भावना, सामूहिक उत्साह आहे, असंही त्या म्हणाल्या. आपण राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा पाहिली आहे. भविष्यात या घटनेकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं जाईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.