देश

Droupadi Murmu: काश्मिरी जनतेनं भारताच्या शत्रूंचा खोटा प्रचार हाणून पाडला; राष्ट्रपतींनी सांगितली सरकारची कामगिरी

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेच्या कामकाजाला आता सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही सभागृहाला संबोधित केलं. आपल्या अभिभाषणात त्यांनी नव्या सरकारचा उद्देश, यापूर्वीच्या कामांची माहिती आणि लोकसभा निवडणुकीत दिसलेल्या बदलांवर भाष्य केलं.

काश्मीरमध्ये यंदा विक्रमी मतदान झालं, यापूर्वी होणाऱ्या कमी मतदानाचा प्रचार भारताच्या शत्रूंकडून काश्मिरी लोकांचं मत असा केला जात होता. पण या सर्व आरोपांना काश्मिरी जनतेनं चोख प्रत्युत्तर दिल्याचं त्यांनी सांगितलं. (President Droupadi Murmu Monsoon Session Kashmir Voting Loksabha Electio 2024 Parliament joint address)

द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, "कोट्यवधी देशवासीयांच्यावतीनं, मी भारतीय निवडणूक आयोगाचे आभार व्यक्त करू इच्छिते. ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दशकांपासूनचे मतदानाचे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. गेल्या 4 दशकांपासून काश्मीरमध्ये बंदचे प्रकार वारंवार होत होते या दरम्यान काश्मीरमध्ये मतदानाची टक्केवारी कमी असायची. काश्मीरी जनतेचं हेच मत असल्याचा प्रचार भारताच्या शत्रूंकडून आंतरराष्ट्रीय मंचांवर केला जात होता. परंतू यावेळी, काश्मीर खोऱ्यानं अशा सर्व शक्तींना चोख प्रत्युत्तर दिलं आहे"

राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या, "देशात सहा दशकांनंतर पूर्ण बहुमत असलेलं स्थिर सरकार स्थापन झालं आहे. जनतेने या सरकारवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे. लोकांना माहिती आहे की फक्त हे सरकारच त्यांच्या आकांक्षा पूर्ण करू शकते. 18वी लोकसभा ही अनेक अर्थानं ऐतिहासिक लोकसभा आहे. आगामी अधिवेशनातील अर्थसंकल्प सरकारच्या दूरगामी धोरणांचा आणि भविष्यकालीन दृष्टिकोनाचा प्रभावी दस्तऐवज ठरणार आहे, सामाजिक निर्णय अनेक ऐतिहासिक पाऊलं ही या अर्थसंकल्पात पाहायला मिळतील"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SAW: भारताच्या महिलांसमोर मालिका वाचवण्याचे आव्हान; दुसऱ्या T20 मध्ये आज दक्षिण आफ्रिकेशी लढत

'नारीशक्ती दूत' ॲपवरुन लाखो लाडक्या बहिणी घरी बसूनच भरताहेत अर्ज; नेमका कसा करायचा अर्ज? जाणून घ्या सविस्तर..

Maharashtra Live News Updates : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार झाले सहभागी

Relationship Tips : जोडप्यांमध्ये वाढणाऱ्या भांडणाचे कारण असू शकतं ‘मायक्रो चिटींग’, पण हे नक्की आहे तरी काय?

Smart Ring : आता स्मार्टवॉचचा जमाना झाला जुना! तुमचा पर्सनल फिटनेस ट्रॅकर तुमच्या बोटात,ते ही फक्त एवढ्या कमी किंमतीमध्ये

SCROLL FOR NEXT