pm candidate esakal
देश

देशात पंतप्रधनपदाचे किती दावेदार आहेत; जाणून घ्या

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नितीश कुमार हे एकमेव विरोधी पक्षाचे नेते नाहीत

सकाळ डिजिटल टीम

देशात पंतप्रधनपदाचे किती दावेदार आहेत जाणून घ्या

बिहार मध्ये नितीश कुमार यांनी केलेल्या राजकारणा मुळे राज्याच राजकारण ढवळुन निघाल आहे, त्याच बरोबर आता नितीश कुमार पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहिला लागले आहेत. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नितीश कुमार हे एकमेव विरोधी पक्षाचे नेते नाहीत तर सध्या विरोधी पक्षात असे किमान सहा नेते आहेत, जे स्वत:ला पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानतात. यापैकी कोणीही हे उघडपणे बोलत नसले तरी त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर सर्व प्रयत्न सुरू आहेत.

राहुल गांधी

विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाचे सर्वात मोठे आणि चर्चेत आसलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत, राहुल गांधी 2014 पासुन यासाठी प्रयत्न करत आहेत . मात्र, त्याचे स्वप्न आजतागायत पूर्ण झालेले नाही. भाजप सत्तेत आल्यानंतर आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर संपूर्ण देशात काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळेच आता राहुल गांधी व्यतिरिक्त प्रादेशिक पक्षांचे नेतेही पंतप्रधानपदासाठी इच्छा व्यक्त करत आहेत.

नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री झाल्यापासुन ते विरोधी पक्षाचा प्रमुख चेहरा होण्यापर्यंत चर्चा होत आहे. दरम्यान हे पहिल्यांदा नाही तर, नितीश कुमार 2014 पासुन चर्चेत आहेत. जेव्हा भाजप ने पंतप्रधान पदाचे नाव जाहीर केल नव्हत तेव्हा नितीश कुमार हे प्रभळ दावेदार असल्याचे समजले जात होते. दरम्यान नरेंद्र मोदी आल्या नंतर त्यांच्या नावाला पुर्ण विराम लागला. मध्यांतरी नितीशकुमार यांनीही भाजपच्या विरोधात जाऊन पुन्हा वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. यावेळी पुन्हा नितीश कुमार यांनी विरोधकांना एकत्र करण्याबाबत बोलले आहे. मात्र, नितीश यांनी पंतप्रधानपदाच्या प्रश्नावर हात जोडले.

ममता बॅनर्जी

टीएमसी चे अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारांच्या रेस मधील मजबुत दावेदार आहेत. ममता बॅनर्जी ह्या भाजप आणि मोदी यांच्या वर खुल्या पणाने टीका करतात. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर ममता यांचा तेवर अधिक वाढला आहे. राष्ट्रीय स्तरावर त्या पक्षाचा विस्तार करत आहेत. ईशान्येतील अनेक राज्यांत ममता यांनी काँग्रेसचे आमदार आणि खासदार फोडले आहेत. याशिवाय हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील नेत्यांना पक्षाशी जोडण्यात त्या व्यस्त आहेत.

के.चंद्रशेखर राव

टीआरएस पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगना चे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे पण पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार आहेत. केसीआर राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रपती निवडणुकी दरम्यान त्यांनी मोदी यांच्या वर उघडपणे टीका केली होती. ते तेलंगाना मधुन कोठेही गेले तरी ते हिंदी भाषेत लोकांशी संवाद साधतात.

अरविंद केजरीवाल

आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री हे पण मजबुत दावेदार आहेत, पंजाब विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणल्या नंतर ते आजूनच चिर्चेत आले आहेत, केजरीवाल सध्या इतर राज्ये जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे संपूर्ण लक्ष गुजरात, हिमाचल प्रदेशात आहे. त्यांचा पक्ष या राज्यांमध्ये काही चांगले करू शकला, तर ते विरोधी पक्षाच्या वतीने उमेदवारी निश्चित करतील.

अखिलेश यादव

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखलेश यादव त्यांचे समर्थकही त्यांना पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार म्हणतात. मात्र, ग्राउंड रिअॅलिटी पाहिली तर अखिलेश अजूनही यूपीमध्येच आपले पाय बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ज्याला यांचा पंतप्रधानपदा साठी पाठिंबा मिळेल, त्याचा दावा अधिक बळकट होईल, हे निश्चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT