जयराम रमेश  Sakal
देश

Jairam Ramesh : मोदींच्या मुलाखतीमध्ये महागाईवर एकही शब्द नाही ? जनतेच्या प्रश्नांशी काहीही सोयरसुतक नसल्याची काँग्रेसची टीका

परंतु या प्रश्नांना त्यांनी संपूर्णपणे बगल दिली आहे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली ः ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका तासापेक्षा मोठी मुलाखत दिली आहे. परंतु या संपूर्ण मुलाखतीमध्ये केवळ दोन वेळा रोजगार हा शब्द आला तर अग्निवीर, महागाई, महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्या या मुद्यांवर एक शब्दही पंतप्रधान मोदी यांनी उच्चारला नाही, त्यामुळे पंतप्रधानांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट होत आहे’’ असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस खासदार जयराम रमेश यांनी केला आहे.

पंतप्रधानांची ही मुलाखत सोमवारी बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आल्यानंतर या मुलाखतीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त रमेश यांनी ‘एक्स’वर लिहिले आहे की, जवळपास एक तासाच्या मुलाखतीमध्ये जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे देणे अपेक्षित होते. परंतु या प्रश्नांना त्यांनी संपूर्णपणे बगल दिली आहे. या मुलाखतीमध्ये देशातील वाढती महागाईवर एकही शब्द पंतप्रधान बोलले नाही. देशातील वाढत्या बेरोजगारीवर पंतप्रधानांना बोलणे योग्य वाटले नाही. गेल्या ५० वर्षात अधिक बेरोजगार सध्या देशात आहेत. अनेक बेरोजगार युवक युद्धसदृश स्थितीमध्ये रोजगार शोधण्यासाठी परदेशात जात आहेत. यावर पंतप्रधानांना एक शब्द बोलता आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 नोव्हेंबर 2024

आजचे राशिभविष्य - 25 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT